सावंतवाडीत क्रीडा, सांस्कृतिक उर्जेचा संगम

सावंतवाडीत क्रीडा, सांस्कृतिक उर्जेचा संगम

Published on

07663
सावंतवाडीत क्रीडा, सांस्कृतिक उर्जेचा संगम

‘स्पोर्टस्‌ मिट’ महोत्सव; भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये रंगला सोहळा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३० ः यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल आयोजित ‘स्पोर्टस्‌ मिट २०२५’ हा क्रीडा महोत्सव आज उत्साहात आणि दिमाखात झाला. प्री-प्रायमरीपासून दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थी व पालकांच्या उत्कृष्ट प्रतिसादामुळे कार्यक्रम रंगतदार बनला. रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या या सोहळ्यात क्रीडा आणि सांस्कृतिक ऊर्जेचा अप्रतिम संगम अनुभवायला मिळाला.
शाळेचे संस्थापक अच्युत सावंत-भोसले यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले. अध्यक्षा अॅड. अस्मिता सावंत-भोसले, सचिव संजीव देसाई, सदस्या सानिका देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, मुख्याध्यापिका प्रियंका देसाई, उपमुख्याध्यापिका अवंतिका नाईक उपस्थित होत्या. क्रीडा मशाल प्रज्वलित करून आणि आकर्षक मार्च पासद्वारे स्पर्धेचे औपचारिक उद्‍घाटन केले. विविध हाऊसच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या शिस्तबद्ध संचलनाने उपस्थितांची मने जिंकली. प्री-प्रायमरी विद्यार्थ्यांच्या स्पर्धांनी कार्यक्रमाला सुरुवात झाली. पुढे प्रायमरी व सेकंडरी विभागातील विविध क्रीडा प्रकारांनी वातावरण रंगले. रस्सीखेच स्पर्धा मुख्य आकर्षण ठरली.
विद्यार्थ्यांनी सादर केलेले मार्शल आर्टस्‌चे दिमाखदार प्रदर्शन कार्यक्रमाचा केंद्रबिंदू ठरला. पारंपरिक लाठी-काठी, दांडपट्टा व तलवारबाजी यांच्या प्रात्यक्षिकांना सर्वांची दाद मिळाली. लहान मुलांनी सादर केलेला मल्लखांब हा प्रकारही विशेष आकर्षण ठरला. विद्यार्थ्यांचे कलाकौशल्य पाहून प्रेक्षक भारावून गेले. कार्यक्रमाच्या शेवटी सादर झालेल्या ‘फायर बॉल’मधून आरपार जाण्याचा थरारक प्रयोग हा धाडसी आणि रोमांचक क्षण ठरला. तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या उपस्थितीत सादर झालेल्या या धाडसी खेळाने सर्वांची वाहवा मिळवली. स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, मेडल व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com