मालवणात आज भाजपतर्फे रॅली
मालवणात आज
भाजपतर्फे रॅली
मालवण, ता. ३० : मालवण नगरपालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून या पार्श्वभूमीवर भाजपच्यावतीने उद्या (ता. १) सकाळी १० वाजता भाजपच्या सर्व उमेदवारांसाठी भव्य प्रचार रॅलीचे आयोजन केले आहे. तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी ही माहिती दिली. या प्रचार रॅलीला महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते आशिष शेलार आणि पालकमंत्री नीतेश राणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. भाजपच्या उमेदवारांसाठी ही रॅली निर्णायक ठरणार आहे.
सकाळी १० वाजता भरड नाका येथून रॅलीला सुरुवात होणार आहे. रॅलीच्या माध्यमातून मंत्री शेलार हे बाजारपेठेतील प्रत्येक नागरिकाची प्रत्यक्ष भेट घेऊन संवाद साधणार आहेत. भरड नाका येथून सुरू होणारी ही रॅली बाजारपेठमार्गे पुढे फोवकांडा पिंपळ येथे समाप्त होणार आहे. या रॅलीच्या माध्यमातून भाजप नागरिकांपर्यंत पोहोचून आपले उमेदवार विजयी करण्यासाठी आवाहन करणार आहे, असे श्री. चिंदरकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

