वेंगुर्लेत व्यापाऱ्यांनी अफवांना बळी पडू नये ः नीतेश राणे

वेंगुर्लेत व्यापाऱ्यांनी अफवांना बळी पडू नये ः नीतेश राणे

Published on

07690

वेंगुर्लेत व्यापाऱ्यांनी अफवांना
बळी पडू नये ः नीतेश राणे

दुकानांची इंचभरही जागा जाऊ देणार नाही

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ३० ः येथील बाजारपेठेतील दुकानांची एकही इंच जागा जाऊ देणार नाही. व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल. व्यापाऱ्यांमध्ये गैरसमज पसरवले जात असून नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. बाजारपेठ रुंदीकरण हा विषय आता संपलेला आहे. व्यापारी वर्गाला साथ देण्याची माझी नैतिक जबाबदारी आहे, असे पालकमंत्री नीतेश राणे यांनी येथील पत्रकार परिषदेत सांगितले.
वेंगुर्ले भाजप मध्यवर्ती कार्यालयात आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, तालुकाप्रमुख विष्णू परब, नगराध्यक्ष उमेदवार दिलीप गिरप व नगरसेवक उमेदवार उपस्थित होते.
पालकमंत्री राणे म्हणाले, ‘शहरातील नागरिकांना १८ प्रकारच्या नागरी सुविधा देणे, सांडपाणी प्रश्न सोडवणे तसेच पार्किंगची सुविधा आरक्षित जागेवर करणार आहोत. मच्छीमार्केटचा भाग २ करण्यासाठी नगरपरिषदबरोबर प्रयत्न करणार. शहराचा समतोल विकास करण्यासाठी नवीन प्रकल्प उभे करू. उपजिल्हा रुग्णालयात चांगले डॉक्टर, यंत्रसामग्री, सुविधा उपलब्ध करून सुसज्ज सेंट लुक्स हॉस्पिटल उभे करण्यात येईल. भाजप विकासाच्या मार्गावर चालणारा सेवाभावी पक्ष असून पंतप्रधान, मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि नगराध्यक्ष प्रत्येक पातळीवर लोकांची सेवा आणि सेवेसाठी सत्ता वापरणे असा एककलमी कार्यक्रम आहे. वेंगुर्लेचा विकास करण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने सज्ज आहोत.’
ते म्हणाले, ‘प्रभाग ३ या वेंगुर्लेच्या भागात सुविधा हव्या तशा मिळाल्या नाहीत. वडखोल प्रभागाचा विकास हव्या त्या दृष्टीने झाला नाही. आता आम्ही सुहास गवंडळकर व गौरी मराठे यांसारखे चांगले उमेदवार दिले आहेत. तेथील प्रश्न सोडवणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यात तालुका निहाय उमेदचा एक मॉल देण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला आहे. प्रभाग ६ व ७ मध्ये जमीन एकाची तर घरे दुसऱ्याची आहेत. त्यासाठी आता प्रॉपर्टी कार्ड तुमच्या नावाने करण्याचे काम लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन करणार आहे. पुढील २५ वर्षांचे नियोजन नजरेसमोर असून त्यासाठी मतरुपी आशीर्वाद मागत आहोत.’
...................
महायुतीचा नेहमीच सन्मान ठेवणार
आम्ही मित्रपक्षांवर कधीच टीका टिपण्णी केली नाही. आमच्यावर असंख्य वार झाले. खालच्या पातळीची टीका झाली; मात्र भाजपच्या एकाही नेत्याचे वक्तव्य महायुतीच्या विरोधात नाही. महायुतीचे घटक पक्ष म्हणून आम्ही मान ठेवणार, असे पालकमंत्री राणे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com