मुणगे कारिवणेवाडी शाळेचे क्रीडा महोत्सवामध्ये वर्चस्व
swt3023.jpg
07692
मुणगे - क्रीडा महोत्सवातील गुणवंत विद्यार्थ्यांसोबत मुख्याध्यापक प्रवीण सावरे, दीपिका बागवे, अश्विनी मुणगेकर व इतर.
मुणगे कारिवणेवाडी शाळेचे
क्रीडा महोत्सवामध्ये वर्चस्व
सकाळ वृत्तसेवा
मुणगे, ता. ३०ः येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारिवणेवाडीच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेत सुयश मिळविले. पोयरे - मुणगे केंद्रबलांतर्गत बाल कला, क्रीडा ‘ज्ञानी मी होणार’ महोत्सव २०२५-२६ च्या क्रीडा स्पर्धा केंद्रशाळा पोयरे गांगोरामेश्वर येथे पार पडल्या. या क्रीडा महोत्सवामध्ये मुणगे कारिवणेवाडी शाळेने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.
यामध्ये ५० मीटर धावणे (मुलगे) - प्रथम अक्षय निकम, ५० मीटर धावणे (मुली) प्रथम - मयुरी पवार, १०० मीटर धावणे (मुली) - द्वितीय पल्लवी निकम. उंच उडी (मुले) तृतीय क्रमांक - अक्षय निकम, उंच उडी (मुली) द्वितीय क्रमांक - पल्लवी निकम, लांब उडी (मुले) प्रथम - अक्षय निकम, लांब उडी (मुली) तृतीय - स्वरा निकम. ५० X ४ रिले (मुलगे) द्वितीय - रितेश लब्दे, आकाश पवार, अजय निकम, अक्षय निकम, ५०X४ रिले (मुली) प्रथम - निधी राणे, स्वरा निकम, पल्लवी निकम, मयुरी पवार. ‘ज्ञानी मी होणार’ तृतीय क्रमांक - निधी राणे, रितेश लब्दे. समूहनृत्य प्रथम - निधी राणे, स्वरा निकम, मयुरी पवार, रितेश लब्दे, अजय निकम, अक्षय निकम, आकाश पवार, मयुर परुळेकर, वीरा पाडावे, स्वराज सावरे. समूहगान स्पर्धेत विद्यार्थ्यांनी चतुर्थ क्रमांक पटकावला.
यशस्वी सर्व खेळाडू, शिक्षक, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती यांचे ग्रामस्थांतून अभिनंदन करण्यात येत आहे. मार्गदर्शक मुखाध्यापक प्रवीण सावरे, अंगणवाडी सेविका दीपिका बागवे, मदतनीस अश्विनी मुणगेकर यांचे सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

