''समाजसेवक'' पुरस्कार चिंदरकर यांना जाहीर

''समाजसेवक'' पुरस्कार चिंदरकर यांना जाहीर

Published on

swt14.jpg
O07754
विद्याधर चिंदरकर

‘समाजसेवक’ पुरस्कार
चिंदरकर यांना जाहीर
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १ः बॅ. नाथ पै सेवांगण मालवणच्या वतीने देण्यात येणारा मधू वालावलकर समाजसेवक पुरस्कार वराड भंडारवाडा (ता. मालवण) येथील सामाजिक कार्यकर्ते विद्याधर चिंदरकर यांना जाहीर झाला आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, सामाजिक कार्यकर्ते व बॅ. नाथ पै सेवांगण संस्थापक सदस्यांपैकी एक असणारे मधू वालावलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी सामाजिक कार्यकर्त्याला हा पुरस्कार दिला जातो.
यावर्षी या पुरस्कारासाठी चिंदरकर यांची निवड केली आहे. चिंदरकर हे पी. के. सावंत पतसंस्थेच्या कट्टा शाखेत कर्मचारी आहेत. त्यांच्या समाजसेवेची दखल घेऊन त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण रविवारी (ता. ७) दुपारी ३ वाजता वराड भंडारवाडा येथे मान्यवरांचे उपस्थितीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन ॲड. देवदत्त परुळेकर, किशोर शिरोडकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, शैलेश खांडाळेकर, श्याम पावसकर, बापू तळावडेकर, दीपक भोगटे, विकास म्हाडगुत, वैष्णवी लाड यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com