वेंगुर्लेत निवडणुकीसाठी १६ मतदान केंद्रे निश्चित
वेंगुर्लेत निवडणुकीसाठी
१६ मतदान केंद्रे निश्चित
वेंगुर्ले, ता. १ ः येथील नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष आणि २० नगरसेवक पदांसाठी उद्या (ता. २) निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी १६ मतदान केंद्रे निश्चित केली आहेत.
यात प्रभाग एक मध्ये वेंगुर्ले शाळा क्र. तीन, होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज (भटवाडी), प्रभाग क्र. दोनमध्ये वेंगुर्ले भटवाडी शाळा क्र. दोन, वेंगुर्ले शाळा क्र. तीन, प्रभाग तीनमध्ये वेंगुर्ले भटवाडी शाळा क्र. एक, बॅ. नाथ पै सभागृह, कॅम्प, प्रभाग क्र. चारमध्ये वेंगुर्ले शाळा क्र. चार, पंचायत समिती (नवीन इमारत), प्रभाग क्र. पाचमध्ये राणी लक्ष्मीबाई कन्याशाळा वेंगुर्ले, प्रभाग क्र. सहामध्ये मदर तेरेसा स्कूल, प्रभाग सातमध्ये वेंगुर्ले शाळा क्र. दोन, प्रभाग आठमध्ये पंचायत समिती कार्यालय वेंगुर्ले (जुनी इमारत), नगरवाचनालय वेंगुर्ले, प्रभाग नऊमध्ये समाज मंदिर आनंदवाडी, वेंगुर्ले शाळा क्र. चार (अंगणवाडी) आणि प्रभाग दहामध्ये वेंगुर्ले हायस्कूलचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

