देवगड प्रशालेत विद्यार्थ्यांची
''ग्लोबल''मार्फत नेत्र चिकित्सा

देवगड प्रशालेत विद्यार्थ्यांची ''ग्लोबल''मार्फत नेत्र चिकित्सा

Published on

07797

देवगड प्रशालेत विद्यार्थ्यांची
‘ग्लोबल’तर्फे नेत्र चिकित्सा

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १ : येथील शेठ म. ग. हायस्कूल आणि पिंगुळी येथील ग्लोबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन शाळेत करण्यात आले होते. येथील दीक्षित फाउंडेशनने हे शिबिर पुरस्कृत केले होते.
मोबाईलच्या वापरामुळे विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या समस्या वाढत आहेत. याचे गांभीर्य ओळखून दीक्षित फाउंडेशनचे अध्यक्ष निरंजन दीक्षित यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी मंचावर श्री. दीक्षित यांच्यासह ग्लोबल फाउंडेशनचे व्यवस्थापक प्रसाद परब, त्यांचे सहकारी, मुख्याध्यापक प्रवीण खडपकर आदी उपस्थित होते. दीपप्रज्वलन आणि शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून शिबिराचे दीक्षित यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले. यावेळी दीक्षित फाउंडेशनमार्फत विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या किल्ले बनवा स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले. प्रास्ताविकामध्ये मुख्याध्यापक खडपकर यांनी शाळेच्या उपक्रमांसाठी दीक्षित यांचे मिळत असलेले मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य याबद्दल शाळा आणि संस्थेच्यावतीने त्यांचे आभार मानले. या शिबिराचा शाळेतील सुमारे ६६३ विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com