गोव्यातील पदयात्रेकरूंना ‘सिंधुमित्र’तर्फे चहा, नाष्टा
07818
गोव्यातील पदयात्रेकरूंना
‘सिंधुमित्र’तर्फे चहा, नाश्ता
ओटवणे, ता. १ ः जुने गोवा येथील फेस्त उत्सवासाठी पदयात्रेने जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्रिस्ती बांधवांच्या सेवेसाठी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेने या वर्षीही कोलवाळ येथील चॅपेलमध्ये जिल्ह्यातील सर्व पदयात्रेकरूंसाठी नाष्टा व चहाची व्यवस्था केली. या पदयात्रेत दरवर्षीप्रमाणे ‘देशसेवा मानवतेचा मार्ग’ हे अभियान राबवून याबाबतच्या पत्रकांचे यात्रेकरूंना वितरण केले.
गोव्याच्या साहेबाचा फेस्त ३ डिसेंबरला होतो. यानिमित्त सिंधुदुर्गातील अनेक ख्रिस्ती बांधव जुने गोवा चर्चपर्यंत पदयात्रा करतात. या पदयात्रेकरूंमध्ये सिंधुमित्र प्रतिष्ठानद्वारे विविध विषयांवर जनजागृती करण्यात येते. पहाटे तीनच्या सुमारास कार्यकर्ते गोव्याच्या दिशेने निघून पहाटे ५ ते सकाळी १० पर्यंत हा उपक्रम राबवला. पदयात्रेकरूंच्या वतीने इलियास फर्नांडिस, फादर थॉमस फर्नांडिस, अँड्र्यु डिमेलो, जेम्स डिसोजा, जॅकी फेराव, मायकल डिसोजा, मारिया डिसोजा, मिशन फर्नांडिस यांनी सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या या सामाजिक बांधिलकीचे आभार मानले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विशाल पाटील, भार्गवराम शिरोडकर, गुरुनाथ राऊळ, श्रीकांत दळवी, भगवान रेडकर, दीपक गावकर, सिद्धेश मणेरीकर, फ्रँकलिन फर्नांडिस यांनी नियोजन केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

