४२ हजार ५८२ मतदार निवडणार चिपळूणचे कारभारी

४२ हजार ५८२ मतदार निवडणार चिपळूणचे कारभारी

Published on

- ratchl११.jpg-
२५O०७८०७
चिपळूण ः न्यू इंग्लिश स्कूल येथून मतदान केंद्रावर निघालेल्या मतपेट्या व अधिकारी, कर्मचारी.
------
चिपळूणचे कारभारी ४२ हजार ५८२ मतदार निवडणार
आज मतदार ; प्रशासन सज्ज, महाराष्ट्र हायस्कूलमध्ये सखी केंद्र, ५३१ अधिकारी तैनात
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १ ःचिपळूण पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ४२ हजार ५८२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये २१ हजार ५९६ महिला व २० हजार ९८६ पुरुष मतदारांचा समावेश आहे. नगराध्यक्ष व २८ नगरसेवकपदांसाठी २ डिसेंबरला मतदान होत असून, प्रशासनाचे त्याची जय्यत तयारी केली आहे. मतदानासाठी शहरातील ४८ केंद्रावर मतपेट्या रविवारी (ता. ३० नोव्हेंबर) दुपारीच रवाना करण्यात आल्या.
नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शहरातील २६ ठिकाणी ४८ केंद्रे कार्यरत राहणार आहेत. यातील एकही केंद्र संवेदनशील नाही. या ४८ केंद्रापैकी बांदल हायस्कूलमधील केंद्र आदर्श म्हणून तर महाराष्ट्र हायस्कूलमधील मतदान केंद्र सखी केंद्र म्हणून तयार केले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय यंत्रणा काम करत असून, या कामी ५३१ अधिकारी, कर्मचाऱ्यांची फौज सज्ज झाली आहे.
शहराचे २९ नवे कारभारी निवडण्यासाठी एकूण ४२ हजार ५८२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने आपली तयारी पूर्ण केली आहे. शहरातील २६ इमारतींमध्ये ४८ मतदान केंद्र राहणार आहेत. त्यासाठी आवश्यक दुरुस्त्या करून घेण्यात आल्या असून, सर्व सोयीसुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. या प्रक्रियेसाठी ७ क्षेत्रीय अधिकारी, २० नोडल अधिकारी, ४८ मतदान केंद्राध्यक्ष, १४४ मतदान अधिकारी, ४८ शिपाई, १०६ पोलिस, होमगार्ड, ४८ अंगणवाडी सेविका, आशासेविका, ९० कार्यालयीन कर्मचारी, २० राखीव कर्मचारी अशी ५३१ जणांची फौज सध्या सज्ज झाली आहे.
------
चौकट
तपासणीनाक्यांवर ५०० वाहनांची तपासणी
काही दिवसांपासून २ फिरती भरारीपथके, २ व्हिडिओ सर्व्हेक्षण पथके, ३ व्हिडिओ व्ह्युविंग पथके शहरात फिरत असून, त्यांचे संपूर्ण परिस्थितीवर लक्ष आहे. तसेच पागनाका, बहादूरशेख मच्छीमार्केट, पेढे फरशीतिठा, कळंबस्ते फाटा, मिरजोळी बायपास येथे ५ तपासणी नाके तयार करण्यात आले असून, येथे दिवसाला ५००हून अधिक वाहनांची तपासणी केली जाते; मात्र आजपर्यंत एकही संशयित वस्तू जप्त करण्यात आलेली नाही. शांततेत व कोणतेही दडपण न घेता मतदारांनी मतदान करावे यासाठी प्रशासन विशेष प्रयत्न करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com