मिळंदमध्ये योजनांसाठी नोंदणी शिबिर

मिळंदमध्ये योजनांसाठी नोंदणी शिबिर

Published on

मिळंदमध्ये योजनांसाठी नोंदणी शिबिर
पावस ः राजापूर तालुक्यातील मिळंद-सावडाव ग्रुपग्रामपंचायतीतर्फे ग्रामपंचायत सभागृहात घरेलू योजना, ज्येष्ठ नागरिक योजना, बांधकाम कामगार योजनेच्या नोंदणीसाठी शिबिर झाले. शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात १५० हून अधिक लाभार्थ्यांनी नोंदणी केली. नोंदणीसाठी राजापूरहून पवार व पांचाळ आले होते तसेच सरपंच कीर्ती आयरे, ग्रामसेवक अमृता शिवलकर, मिळंदचे पोलिसपाटील प्रवीण मोरे, सावडावचे पोलिसपाटील नीलेश राणे, शिंदे शिवसेना शाखाप्रमुख एकनाथ गुडेकर, ग्रामपंचायत कर्मचारी नीलेश आयरे, सुनील विश्वासराव, नितीन आचिरणेकर आदी उपस्थित होते.

आंजणारीत आजपासून जयंती उत्सव
लांजा ः तालुक्यातील आंजणारी पुलालगत मठ येथील दत्तमंदिरामध्ये २ ते ४ डिसेंबर या कालावधीत दत्तजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या मंदिरालगतच काही फुटांच्या अंतरावर गरम पाण्याची आणि कोमट पाण्याचे दोन नैसर्गिक झरे आहेत. हे झरे बारमाही वाहणारे आहेत. दत्तजयंतीनिमित्त या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २ डिसेंबरला सकाळी ८ ते ९ वा. श्रींची पूजा व अभिषेक त्यानंतर दत्तयाग व आरती, दुपारी १.३९ ते ३.३० या कालावधीत महाप्रसाद, ३.३० ते ५ या वेळेत प्रभानवल्ली येथील जाधव बुवा यांचे भजन, रात्री आरती, हरिपाठ, प्रदक्षिणा असे कार्यक्रम होतील. ३ ला सकाळी श्रींची पूजा व अभिषेक, दत्तयाग व आरती, दुपारी महाप्रसाद, भजन, आरती, सायं. ७.३० ते ९ भजन, प्रदक्षिणा असे कार्यक्रम होतील. ४ ला सकाळी ८ वा. श्रींची महापूजा, दुपारी महाप्रसाद, ३ वा. भजन, सायं. ५ ते ७ या वेळेत श्री दत्तजन्म कीर्तन, रात्री आरती, प्रदक्षिणा असे कार्यक्रम होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com