कुडाळात ‘एड्स’विषयी जनजागृती रॅली
07838
कुडाळात ‘एड्स’विषयी जनजागृती रॅली
विद्यार्थ्यांचा सहभाग; संत राऊळ महाराज महाविद्यालयाचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १ ः येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयातर्फे आज जागतिक एड्स दिनानिमित्त एनएसएस व एनसीसी विभागांद्वारे तसेच कोकण कला आणि शिक्षण विकास संस्था, सिंधुदुर्ग आणि रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य जनजागृती रॅली काढली.
प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीचे उद्घाटन केले. यावेळी कोकण कला संस्थेचे अमित पाटील आणि त्यांचे सहकारी, जिल्हा एड्स नियंत्रण कक्ष, सिंधुदुर्गचे मानसिंग पाटील, महाविद्यालयाचे एनसीसी प्रमुख डॉ. एस. टी. आवटे, एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. भावेश चव्हाण, प्रा. सभा शहा, प्रा. प्रणव तेंडोलकर, डॉ. योगेश कोळी, डॉ. कमलाकर चव्हाण उपस्थित होते.
रॅलीमध्ये महाविद्यालयातील दोनशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. संत राऊळ महाराज महाविद्यालय ते कुडाळ बाजारपेठ असा रॅलीचा मार्ग होता. विद्यार्थ्यांनी एड्सविषयी जागरूकता, प्रतिबंध आणि सामाजिक जबाबदारी याबाबत जनजागृतीपर घोषवाक्ये आणि फलकांद्वारे संदेश दिले. रॅलीनंतर महाविद्यालयात श्री. पाटील यांनी विद्यार्थ्यांना एड्सविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी एड्स दिनाचे महत्त्व, प्रतिबंधात्मक उपाययोजना, सुरक्षित आचरण आणि युवा पिढीची जागरूकता याबाबत सविस्तर माहिती दिली. जागतिक एड्स दिनानिमित्त घेण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाण निर्माण करणारा आणि आरोग्यविषयक सजगता वाढवणारा ठरल्याचे प्राध्यापकवृंदाने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

