राजापूर-राजापुरात ५४ उमेदवारांसाठी आज मतदान

राजापूर-राजापुरात ५४ उमेदवारांसाठी आज मतदान

Published on

राजापुरात ५४ उमेदवारांसाठी आज मतदान
प्रशासन सज्ज; महिला मतदारांची संख्या अधिक
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १ः राजापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाच्या वीस जागांसाठी मंगळवारी (ता. २) मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. एका केंद्रावर आठ याप्रमाणे १० मतदान केंद्रांवर ८० निवडणूक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, सर्व कर्मचारी निवडणूक केंद्रांवर रवाना झाले आहेत. नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदासाठी होत असलेल्या लढतीमध्ये तब्बल ५४ उमेदवार रिंगणात असून, त्यांचे भवितव्य तब्बल ८ हजार १४३ मतदारांच्या हातात आहे.
राजापुरात नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदसाठी दहा प्रभागांतील वीस जागांसाठी निवडणूक होत आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशा होत असलेल्या दुरंगी लढतीमध्ये नगराध्यक्षपदासाठी तीन, तर नगरसेवकपदाच्या वीस जागांसाठी ५१ उमेदवार रिंगणात आहेत. दहा केंद्रांवर मतदान होणार असून, त्यासाठी ८० निवडणूक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. ८ हजार १४३ इतके मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये ४ हजार २१९ महिला मतदार, तर ३ हजार ९२४ इतके पुरुष मतदारांचा समावेश आहे. पुरुष मतदारांच्या तुलनेमध्ये महिला मतदारांची संख्या जास्त आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा होत असलेल्या या लढतीमध्ये अपक्ष उमेदवार उभे ठाकल्याने या निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे. त्यामुळे उद्या होत असलेल्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

चौकट
पोलिस बंदोबस्त
निवडणुकीदरम्यान अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com