बेपत्ता मच्छीमाराचा मृतदेह सापडला

बेपत्ता मच्छीमाराचा मृतदेह सापडला

Published on

बेपत्ता मच्छीमाराचा
मृतदेह सापडला
पावस : रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथील खाडीत बोट बुडाल्याने मच्छीमार पाण्यात बुडून बेपत्ता झाला होता. त्यांचा मृतदेह सोमवारी (ता. १) सकाळी बिर्जेवाडी परिसरात आढळला. मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
अस्लम युनूस पेजे (वय ५६) असे मृत मच्छीमाराचे नाव आहे. ही घटना ३० नोव्हेंबरला घडली होती. रविवारी दुपारी अस्लम पेजे यांनी गावडेआंबेरे येथील एका मच्छीमाराकडे फोन करून तुझ्याकडे मच्छी उपलब्ध आहे का, अशी विचारणा केली होती. त्यांनी मच्छी आहे, असे सांगितल्यानंतर पेजे दुपारी बोट घेऊन गावडेआंबेरेच्या दिशेने निघाले होते. खाडीच्या पाण्यात मध्येच बोटीचा वलवा पाण्यात पडल्यामुळे बोट चालवणे कठीण झाले. त्यांनी काढण्यासाठी पाण्यात उडी टाकली आणि वरती घेऊन येत असताना बोट बाजूला सरकल्यामुळे त्यांना बोटीमध्ये प्रवेश करता आला नाही. त्यामुळे ते पुन्हा पाण्यामध्ये गेले. त्यानंतर ते परत वरती आले नाहीत. त्या दरम्यान गावडेआंबेरे येथील मच्छीमार पेजे अजून का नाही आले म्हणून गावकरीच्या दिशेने निघाले असता त्यांना फक्त बोट दिसली. त्यांनी मच्छीमारांना खबर दिली. तेथील मच्छीमारांनी शोधाशोध केली. सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांचा मृतदेह बिर्जेवाडी परिसरात दिसला.
........
रुग्णवाहिका चालकाविरुद्ध
अपघातप्रकरणी गुन्हा
रत्नागिरी : हातखंबा ते रत्नागिरी जाणाऱ्या रस्त्यावर कारवांचीवाडी फाटा येथील रुग्णवाहिका आणि दुचाकी अपघातातील त्या संशयित रुग्णवाहिका चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. चेतन जयसिंग मयेकर (रा. वांद्री, ता. संगमेश्वर, रत्नागिरी) असे संशयित १०८ रुग्णवाहिका चालकाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. ३०) नोव्हेंबरला सायंकाळी चारच्या सुमारास हातखंबा ते रत्नागिरीकडे येणाऱ्या रस्त्यावर कारवांचीवाडी फाटा येथे घडली. फिर्यादी मयुरी किरण नवाळे (वय २९, रा. नानाई परळी, ता. शाहूवाडी, कोल्हापूर) यांचे पती किरण नवाळे व मुले श्रद्धा व श्रेयस असे दुचाकीने (एमएच-०९-जीवाय-१५६२) कारवांचीवाडी फाटा ते रत्नागिरी येथे येत असताना दुचाकीच्या पाठीमागून येणाऱ्या १०८ रुग्णवाहिकावरील (एमएच-०८-एटी-३८९४) चालकाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात फिर्यादी यांचे पती-किरण व दोन मुले जखमी झाली. या प्रकरणी मयुरी नवाळे यांनी ग्रामीण पोलिसात तक्रार दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com