लांजात १९ केंद्रावर आज मतदान
लांजात १९ केंद्रांवर आज मतदान
लांजा, ता. १ ः लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणुकीसाठी १७ प्रभागांत १९ मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. एकूण १४ हजार २३२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित कुंभार यांनी दिली.
प्रभाग क्र. ६ मध्ये सर्वात जास्त मतदार असून, त्यांची संख्या १०६० एवढी आहे तर सर्वात कमी मतदार प्रभाग क्र. ३ मध्ये असून केवळ ५९६ मतदार आहेत. निवडणुकीसाठी स्त्री मतदारांची संख्या ७ हजार १४५ असून, पुरुष मतदारांची संख्या ७ हजार ८७ आहे. मुख्याधिकारी कुंभार यांनी सांगितले, सर्व मतदान केंद्रांची पाहणी करण्यात आली असून मतदारांच्या सोयीसाठी आवश्यक सुविधा सुनिश्चित केल्या जात आहेत. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी यासाठी सर्व विभाग सज्ज आहेत. या निवडणुकीत मतदान केंद्रावर १२२ कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

