कासार्डे हायस्कूलच्या मुली ''हुशार''
swt21.jpg
07937
सिंधुदुर्गनगरी : सर्वाधिक बक्षिसे मिळविलेल्या कासार्डे हायस्कूलचे विद्यार्थी.
कासार्डे हायस्कूलच्या मुली ''हुशार''
टॅलेंट सर्च स्पर्धेत यशः विविध क्रीडा प्रकारांत ३० पदकांची कमाई
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २ः सिंधुदुर्ग जिल्हा हौशी अॅथलेटिक असोसिएशन, अॅथलेटिक फेडरेशन ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्यावतीने सिंधुदुर्गनगरी येथील क्रीडा संकुल येथे घेण्यात आलेल्या अस्मिता लिग या मुलींच्या टॅलेंट सर्च स्पर्धेत १६१ मुलींनी सहभाग घेतला. यामध्ये कासार्डे हायस्कूलच्या (ता. कणकवली) सर्वाधिक ३० मुलींनी सहभाग घेत पदके मिळविली. महिमा मोहिते हिने ट्रायथलोन सी गटात तिहेरी मुकुट पटकावला. तिने ६० मी., ६०० मी. धावणे, लांब उडी यात प्रथम क्रमांक प्राप्त केला.
या कार्यक्रमासाठी अॅथलेटिक फेडरेशन ऑफ इंडिया यांचे वतीने राजगुरू कोचले हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते. स्पर्धेचे उदघाटन त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक असोसिएशनच्या सचिव कल्पना तेंडुलकर यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बाळकृष्ण कदम, रामदास देशमुख, सार्थक मारकड, बयाजी बुरान, श्री. तडवी, संदीप पेडणेकर, माधुरी खराडे, अमित भाटकर, शैलेश नाईक, जयंत साटम, किरण पिंगुळकर, नम्रता गावकर, निकिता लाड, समद शेख, शादाब पटेल, श्री. जावेद, श्री. बावकर, विजय सोनावणे यांनी सहकार्य केले.
स्पर्धेचा निकाल अनुक्रमे असाः १४ वर्षांखालील मुली ट्रायथलॉन ‘अ’ गट : रेवती फाटक (१७०२), दिया मालवणकर (१६५९), संदीप पेडणेकर (१६४४). गन ट्रायथलोन ''बी'' गट-देवश्री कणसे (१३५४), शरवानी लोट (१२९८), समृद्धी मराठे (१२३६). ट्रायथलोन सी गट-महिमा मोहिते (२१४२), आस्था लिंगवत (१४७१), मधू प्रजापती (१४४६). किड्स जावेलीन-अस्मी सावंत (१४.४०मीटर), तनिष्का पवार (१२.९५ मीटर), सानिका पवार (१२.९० मीटर). सोळा वर्षांखालील मुलीः ६० मीटर धावणे-रिया मोहिते, काजल माधव, लिशा तेली. ६०० मीटर धावणे-आकांक्षा कुंभार, इशिता फर्नांडिस, कोमल नाईक.
थाळी फेक-उर्वशी शेर्लेकर, देवयानी दळवी. गोळा फेक-आर्या गावडे, हर्षदा नाईक, आर्या पावनोजी. भालाफेक-उर्वशी शेर्लेकर, युगा सावंत, साक्षी तेली. लांब उडी-वनिता निकम, आकांक्षा कुंभार, रिया मोहिते. उंच उडी-आर्या सावंत, पौर्णिमा तेली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

