-नाटिकेद्वारे एड्स निर्मूलनाची प्रभावी जागरूकता

-नाटिकेद्वारे एड्स निर्मूलनाची प्रभावी जागरूकता

Published on

-rat२p९.jpg
२५O०७९७४
मंडणगड : नाटिकेतील एका दृश्यात सचिन माळी.
-Rat२p१०.jpg
P२५O०७९७०
कलात्मक मनोरंजनातून एड्सविषयक जनजागृती संदेश देणारी नाटिका पाहण्यासाठी उपस्थित शिक्षकवृंद व विद्यार्थीवर्ग.
----
‘आयुष्यमान’तून एचआयव्हीविषयक जागृती
मंडणगडमध्ये कलाकारांचे साभिनय सादरीकरण ; आरोग्याचा संदेश
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २ ः जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त मंडणगड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयात सचिन माळी ऑफिशियल कलाविश्वतर्फे जागृतीपर आणि संदेशात्मक नाटिकेचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. यातून जनजागृती व मनोरंजनात्मक संदेश देण्यात आला.
एचआयव्ही चाचणीसाठी रक्त दिल्यानंतर प्रतीक्षेत असलेल्या एका तरुणाच्या आयुष्यातील अवघ्या चार तासांच्या या काळात त्याच्या मनात सुरू होणारा विचारांचा कल्लोळ, सामाजिक भान, भीती आणि वास्तवाशी लढा यांचा हृदयस्पर्शी वेध घेणारी ही आयुष्यमान नाटिका उपस्थितांच्या मनावर ठसा उमटवून गेली. एचआयव्हीबाबत अज्ञान, चुकीच्या समजुती आणि सामाजिक भीती यामुळे निर्माण होणाऱ्या मानसिक ताणाचे वास्तववादी चित्रण राजेश शिंदे लिखित संवाद या नाटिकेत दिसून आले. प्रभावी अभिनयाने नाटिकेचे साभिनय सादरीकरण कलाकार सचिन माळी, समिधा सापटे यांनी केले. पार्श्वसंगीत विजय जोशी, आर्ट साहाय्य अतुल पवार, संगीत संयोजन आकाश पवार, प्रसिद्धी विधान पवार तर साउंड समीर येलवे यांनी सांभाळले. शिक्षक, विद्यार्थ्यांनी या नाटिकेचे कौतुक करत एचआयव्हीविषयक माहिती, चाचणीचे महत्त्व आणि सामाजिक स्वीकार याबाबतचा संदेश प्रभावीपणे पोहोचल्याची प्रतिक्रिया दिली. या वेळी कार्यक्रमाला मुख्याध्यापक आबासाहेब हुलगे, उपमुख्याध्यापक अर्जुन हुल्लोळी, समाजसेवक रघुनाथ पोस्टुरे, विजय ऐनेकर, शिक्षकवृंद, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com