आचरा न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात

आचरा न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात

Published on

swt230.jpg
08091
आचरा ः वार्षिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करताना प्रदीप परब-मिराशी, ॲड. सुभाष आचरेकर, जे. एम. फर्नांडीस व इतर मान्यवर.

आचरा न्यू इंग्लिश स्कूलमध्ये
वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २ः न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आचरा या प्रशालेच्या भव्य मैदानात वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात झाल्या. या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन आचरा पीपल्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रदीप परब - मिराशी, सचिव ॲड. सुभाष आचरेकर, शालेय समितीचे अध्यक्ष जे. एम. फर्नांडीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. उद्घाटनप्रसंगी श्री. मिराशी यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून क्रीडाज्योत प्रज्वलित केली. ॲड. आचरेकर यांनी श्रीफळ वाढवून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन केले.
प्रशालेतील जिल्हा व विभागस्तरीय खेळाडूंनी क्रीडाज्योत घेऊन मैदानाला प्रदक्षिणा घातली. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत पाचवी व सहावी, सातवी व आठवी, नववी व दहावी तसेच अकरावी व बारावी या चार गटांतील विद्यार्थ्यांनी १०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर धावणे, रिले, थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक, रस्सीखेच, बॉल बॅलन्सिंग, कोन बॅलन्सिंग, बॉल इन टू बकेट अशा विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी शालेय समिती अध्यक्ष फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली बक्षीस वितरण समारंभ पार पडला. यावेळी शालेय स्कूल समितीचे सदस्य बाबाजी भिसळे उपस्थित होते. श्री. फर्नांडिस, श्री. भिसळे, मुख्याध्यापक घुटुकडे, उपमुख्याध्यापिका माणगावकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते २७० विजेत्या स्पर्धकांना सुवर्ण व रौप्यपदके देऊन गौरविण्यात आले. तीन दिवस चाललेल्या क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com