दाणोली क्रिडा महोत्सवात केसरी शाळेला विजेतेपद
swt236.jpg
08107
दाणोली ः येथे विजेत्या मुलांना श्रीमती भावना गावडे, लक्ष्मण धुरी, रामा गोरे, श्वेता देसाई आदींच्या उपस्थितीत गौरवण्यात आले.
दाणोली क्रिडा महोत्सवात
केसरी शाळेला विजेतेपद
सकाळ वृत्तसेवा
सांगेली, ता. २ः दाणोली येथे झालेल्या जिल्हापरिषद कला क्रिडा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद केसरी प्राथमिक शाळेने मिळवले. या स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
दाणोली येथील कै. बाबुराव पाटयेकर हायस्कूलच्या मैदानात नुकत्याच या स्पर्धा झाल्या. याचे उद्घाटन पारपोली सरपंच कृष्णाजी नाईक, केंद्रप्रमुख श्रीमती भावना गावडे, पारपोली शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हेमंत गावकर, दाणोली बाजार शाळा व्यवस्थापन अध्यक्ष मनोहर मालवणकर, फणसवडे पोलिसपाटील विजय गावडे यांच्यासह राजेंद्र गावडे, श्रीमती नेहा बिर्जे, रविंद्र सावंत, हायस्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. टिळवे आदींच्या उपस्थितीत झाले.
यावेळी दाणोली केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. या महोत्सवात झालेल्या विविध स्पर्धांमध्ये मुलांनी खिलाडूवृत्ती दाखवत स्पर्धेमध्ये रंगत आणली. महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद केसरीला मिळाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या मुलांचा गौरव करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

