दापोली-हर्णैमध्ये पर्यटकांची मिनीबस उलटली

दापोली-हर्णैमध्ये पर्यटकांची मिनीबस उलटली

Published on

rat2p47.jpg-
08100
दापोली ः हर्णै बायपासवर मिनीबसला अपघात झाला.
-------
हर्णैमध्ये पर्यटकांची मिनीबस उलटली
पुण्यातील १० जण जखमी; मागे घेताना दुर्घटना
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. २ ः दापोली तालुक्यातील हर्णै बायपास परिसरात मंगळवारी (ता. २) दुपारी साडेबाराच्या सुमारास पुणे येथील पर्यटकांची मिनीबस उलटली. या अपघातात दहा पर्यटक जखमी झाले. या बसमध्ये पाच कुटुंबे प्रवास करत होती
पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथील मिनीबस (एमएच-१४-जीयू-१६१६) दापोलीत आली होती. त्यातील पाच कुटुंबे एका हॉटेलमध्ये थांबले होते. तेथून घरी परतण्यासाठी निघताना मिनीबस मागे घेत असताना चालकाचा अंदाज चुकला आणि गाडी रस्त्याच्या कडेला उलटली. त्यामुळे काही प्रवाशांना किरकोळ तर काहींना मध्यम स्वरूपाच्या दुखापती झाल्या. जखमी प्रवाशांमध्ये क्षितिज अशोक गुगणे (वय ३५), आरोही पराग गायकवाड (वय ४), पराग पर्शुराम गायकवाड (४०), नेहा पराग गायकवाड (३५), हितेश रमेश चौधरी (४०), ओजस अक्षय कुलकर्णी (५१), सुरेश साहेबराव कुचेकर, महेश दत्तात्रय वाघमारे (३९), प्राजक्ता महेश वाघमारे (३६, सर्व रा. पिंपरी चिंचवड, पुणे) यांना तातडीने आसूद येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर दापोली उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व जखमींची प्रकृती स्थिर असून, आवश्यक उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. या दुर्घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळित झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com