खेड पालिका निवडणुकीसाठी ६२ टक्के मतदान
rat2p49.jpg
O08110
खेड ः प्रभाग क्र. ३ मध्ये वयोवृद्ध मतदारांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला.
-------
खेड पालिका निवडणुकीसाठी ६२ टक्के मतदान
खेड, ता. २ : खेड पालिकेच्या १० प्रभागातील निवडणुकीसाठीच्या २० जागांसाठी मतदान प्रक्रिया शांततेत झाली. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत झालेल्या मतदानामध्ये सुमारे ६२ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे.
सकाळी ७.३० ते ९.३० या सत्रात झालेल्या मतदान ११.४९ टक्के इतके होते तर ११.३० वा. २८.०१ टक्के तर दुपारनंतर १.३० नंतर मतदानाची टक्केवारी वाढल्याने ४१.३४ इतकी झाली होती. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५२.५० टक्के मतदान झाले होते. ५.३० वा. मतदानाची ६२ टक्केवारी वाढलेली दिसून आली आहे.
त्यामुळे मतदारराजाने नेमका कौल कोणाला दिला आहे, हे २१ डिसेंबरला कळणार आहे. या निवडणुकीत शिवसेना - भाजप युती, महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात तिरंगी लढत झाली. या लढतीत बाजी मारून नगर परिषदेची ‘सुभेदारी’ कोणाला मिळते, याकडेच साऱ्यांच्या नजरा आता निकालाकडे लागल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

