देवरूख नगरपंचायतीत ७४.३३ टक्के मतदान

देवरूख नगरपंचायतीत ७४.३३ टक्के मतदान

Published on

देवरूख नगरपंचायतीत ७४.३३ टक्के मतदान
उमेदवारांची धाकधूक वाढली ; मतदारांचा कल कोणाकडे?
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २ ः तालुक्यातील देवरूख नगरपंचायत निवडणुकीसाठी आज शांततेमध्ये मतदान पार पडले. सायंकाळपर्यंत ७४.३३ टक्के मतदान झाले आहे. त्यात १० हजार ७८९ एकूण मतदारांपैकी ८ हजार २० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
देवरूख नगरपंचायत निवडणुकीसाठी सकाळी ७.३० वाजल्यापासून सुरुवात सुरळीतपणे मतदान सुरू झाले. सर्व १७ प्रभागात दुपारी ३.३० वाजेपर्यंत ६४.५५ टक्के इतके मतदान झालेले होते. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. सकाळच्या सत्रात मतदानासाठी लोकांची गर्दी कमी होती. त्यामुळे उमेदवारांमध्ये धाकधूक वाढलेले होती. महायुती विरूध्द महाविकास आघाडी अशी लढत याठिकाणी निश्चित झालेली आहे. देवरूखमध्ये एकूण मतदान १० हजार ९८९ असून त्यापैकी ८ हजार २० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. ७४.३३ टक्के मतदान झाले आहे. दुपारनंतर मतदानाला येणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत गेली. हा ओघ कायम राहून सायंकाळी मतदान संपल्यानंतर विक्रमी मतदान झाले आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांची धाकधूक वाढली असून देवरूखवासीयांचा कल कोणाकडे राहणार याबाबत तर्कवितर्क काढले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com