दुर्ग बांधणी स्पर्धेमध्ये 
अर्जुन गावकर प्रथम

दुर्ग बांधणी स्पर्धेमध्ये अर्जुन गावकर प्रथम

Published on

swt८६.jpg मध्ये फोटो आहे.
मळगाव ः दुर्ग बांधणी स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांसमवेत उपस्थित गुरुनाथ नार्वेकर, सिद्धेश तेंडोलकर आदी.

दुर्ग बांधणी स्पर्धेमध्ये
अर्जुन गावकर प्रथम

मळगाव येथील स्पर्धा ः ‘अष्टविनायक’चा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ८ ः मळगाव रस्तावाडी येथील अष्टविनायक कला, क्रीडा मंडळाच्यावतीने दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या दुर्ग बांधणी स्पर्धेत मळगाव-देऊळवाडी येथील अर्जुन गावकर याने प्रथम क्रमांक पटकाविला.
मळगाव रस्तावाडी येथील अष्टविनायक कला, क्रीडा मंडळातर्फे स्वच्छता मोहीम, एसएससी व स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी सत्कार, शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, दुर्ग बांधणी स्पर्धा तसेच इतर स्पर्धा आदी विविध उपक्रम राबविले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास व त्यांनी बांधलेल्या गड-किल्ल्यांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने ही दुर्ग बांधणी स्पर्धा मंडळाच्यावतीने आयोजित केली. एकूण १३ स्पर्धक सहभागी झाले. यात प्रथम क्रमांक अर्जुन गावकर (श्रीमान रायगड), द्वितीय अथर्व राऊळ (दुर्ग प्रतापगड), तृतीय क्रमांक खुशाल शिरोडकर (दुर्ग प्रतापगड) यांनी मिळविला. उत्तेजनार्थ क्रमांक हर्षिता राऊळ (जंजिरे सिंधुदुर्ग) व देवेश राऊळ (दुर्ग मल्हारगड/सोनोरी) यांनी पटकावला. स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम शुक्रवारी (ता. ७) शारदा विद्यालय मळगाव शाळेच्या सभागृहात पार पडला. स्पर्धेतील प्रथम क्रमांकास २००१, द्वितीय १५०१, तृतीय ७०१, उत्तेजनार्थ ३५१ रुपये, सन्मानचिन्ह व सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविले.
स्पर्धेसाठी प्रसन्न सोनुर्लेकर (कै) दिलीप सोनुर्लेकर स्मरणार्थ), मंडळाचे उपाध्यक्ष सिध्देश तेंडोलकर, राहुल नार्वेकर, राजा राऊळ व शंभा सावंत यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे गुरुनाथ नार्वेकर, मंडळाचे उपाध्यक्ष तेंडोलकर, सदस्य ज्ञानेश्वर राणे, नीलेश नाटेकर, संदेश सोनुर्लेकर, सचिन सोनुर्लेकर, उदय फेंद्रे, अरुण राऊळ, गोविंद कानसे, प्रसाद नार्वेकर, पालक व सहभागी मुले उपस्थित होती. श्री. नार्वेकर यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले. ज्ञानेश्वर राणे यांनी सूत्रसंचालन केले. नीलेश नाटेकर यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष तेंडोलकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com