गिम्हवणेमध्ये घराच्या पडवीला आग

गिम्हवणेमध्ये घराच्या पडवीला आग

Published on

-rat३p२१.jpg, rat३p२२.jpg-
२५O०८२७६
दापोली ः गिम्हवणे येथे घराला लागलेल्या आगीत झालेले नुकसान.
-----
गिम्हवणेमध्ये घराच्या पडवीला आग
साडेतीन लाखांचे नुकसान; कारण अस्पष्ट
सकाळ वृत्तसेवा
गावतळे, ता. ३ ः दापोली शहरालगतच्या गिम्हवणे-सहकारनगर येथे सोमवारी (ता. १) रात्री अचानक लागलेल्या आगीत अब्दुल हमीद अली मसुरकर यांच्या घराच्या पडवीचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीत फ्रीज, वॉशिंग मशिन, अन्य यंत्रसामग्री तसेच लाकूडसाठा जळून खाक झाला. यामध्ये सुमारे ३ लाख ६८ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक पंचनाम्यातून स्पष्ट झाले.
सोमवारी रात्री पडवीतून धूर निघत असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात येताच ग्रामस्थांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. दापोली आणि खेड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाशी संपर्क साधण्यात आला. दापोली नगरपंचायतीचे कर्मचारी तसेच आसपासचे ग्रामस्थ यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. त्यामुळे खेड येथून दापोलीकडे येत असलेला अग्निशमन बंब अर्ध्या रस्त्यातून परत पाठवावा लागला. आग लागल्याची माहिती मिळताच तहसीलदार बोंबे, पोलिस ठाण्याचे अधिकारी, ग्राममहसूल अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. या आगीत सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी मसुरकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. घटनास्थळी झालेला प्राथमिक पंचनामा गिम्हवणे ग्राममहसूल अधिकारी गणेश लोहार यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com