जिल्हा परिषदेने स्पर्धांना निधी द्यावा

जिल्हा परिषदेने स्पर्धांना निधी द्यावा

Published on

swt41.jpg
08407
वालावलः येथे पूर्व केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचा प्रारंभ रश्मी नाईक यांच्या हस्ते झाला. बाजूला केंद्रप्रमुख गोविंद चव्हाण व इतर मान्यवर.

जिल्हा परिषदेने स्पर्धांना निधी द्यावा
रश्मी नाईकः चेंदवण शाळेत केंद्रस्तरीय बाल क्रीडा महोत्सव
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ४ः केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेतून ग्रामीण भागातील मुलांना प्रेरणा मिळत असते. शिक्षक व पालकांसाठी अपार मेहनत घेत असतात. जिल्हा परिषदेकडून या स्पर्धांसाठी भरीव अनुदान मिळणे आवश्यक आहे. वालावल पूर्व केंद्रात एकमेव प्रशस्त मैदान असलेली शाळा चेंदवण क्र. १ असल्याने या स्पर्धांचे आयोजन शक्य असल्याचे प्रतिपादन चेंदवण माजी उपसरपंच रश्मी नाईक यांनी केले.
वालावल पूर्व केंद्रस्तरीय बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव २०२५ स्पर्धा चेंदवण क्र. १ शाळा येथे झाल्या. यावेळी केंद्रप्रमुख गोविंद चव्हाण, माजी उपसरपंच रश्मी नाईक, गोविंद भरडकर, श्री. मयेकर, पोलिसपाटील उमेश शृंगारे, शुभश्री शृंगारे, स्वप्नील चेंदवणकर, रत्नदीप मेस्त्री, चेंदवण हायस्कूल मुख्याध्याक माणिक पवार, संजय भरडकर, मंडप डेकोरेटर गौतम चेंदवणकर, विनायक प्रभू, कृतिका राऊळ, दिव्या चव्हाण, दिव्या सामंत, किशोर गावडे, मनीष वाडयेकर, उपाध्यक्ष साक्षी जोशी, कवठी गावकरवाडी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष प्रेरणा राणे, चेंदवण पडोशीच्या मानसी गुरव, अक्षता तोरसकर, भरत शृंगारे, नरेश मयेकर आदी उपस्थित होते.
स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंना सौ. नाईक यांच्या सहकार्यातून चषक व पदके वितरित करण्यात आली. पालक व ग्रामस्थ यांच्याकडून सर्वांना अल्पोपहार व भोजन व्यवस्था करण्यात आली. या स्पर्धेत लहानगट समूहगीत स्पर्धेत प्रथम शाळा कवठी क्र. १, मोठ्यात गटात शाळा कवठी क्र. १, समूहनृत्य स्पर्धेत लहान गटात प्रथम शाळा चेंदवण क्र. १, मोठ्या गटात प्रथम वालावल पूर्व शाळा, ‘ज्ञानी मी होणार’ लहान गटात प्रथम शाळा वालावल पूर्व, मोठ्या गटात प्रथम कवठी क्र. १ यांनी यश मिळविले. सूत्रसंचालन प्रशांत वारंग व संतोष वारंग यांनी केले. आभार केंद्रप्रमुख गोविंद चव्हाण यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com