पूर्णगड शाळेचा वर्धापनदिन उत्साहात
पूर्णगड शाळेचा
वर्धापनदिन उत्साहात
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड शाळा नं. १ चा १२०वा वर्धापनदिन उत्साहात झाला. त्या निमित्ताने शाळेचा परिसर आकर्षक पद्धतीने सजवण्यात आला होता. शाळेचा जयघोष करत रॅली काढण्यात आली. केकही कापण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊ देण्यात आला. उपक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. उपक्रम यशस्वितेसाठी मुख्याध्यापिका भारती तायशेटे, शिक्षक पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर, विशेष शिक्षिका तृप्ती शिरगावकर यांनी विशेष परिश्रम घेतले. शाळेने हे वर्ष संकल्प वर्ष म्हणून साजरे करण्याचे ठरवले आहे. शाळेच्या या उपक्रमाविषयी शिक्षणविस्तार अधिकारी बीट पावस हिरवे, केंद्रप्रमुख संजय राणे यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.
वेदपाठशाळेच्या वर्धापनदिनी
विविध कार्यक्रम
साडवली ः दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा श्री गणेश वेदपाठशाळा, देवरूख यांच्या 28व्या वर्धापनदिनानिमित्त धार्मिक व ज्ञानरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात ७ डिसेंबरला होणार आहे. पहिल्या दिवशी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत कार्पोरेट कीर्तनकार समीर लिमये (कल्याण) यांचे गुरुसेवा विषयावर कीर्तन होणार आहे. ८ ला गीता उपासनी (पुणे) यांचे अध्यात्मवादी सावरकर विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. ९ ला समारोपाच्या दिवशी रोहिणी माने परांजपे यांचे कीर्तन होणार आहे. त्यांना तबलासाथ केदार लिंगायत आणि हार्मोनिअम साथ चैतन्य पटवर्धन करणार आहेत. वर्धापनदिन समारोहाच्या काळात दररोज सकाळी ८ ते १२ या वेळेत श्रीसूक्त याग आणि रात्री ८ ते ९ या वेळेत भोजन प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेच्या सर्व कार्यक्रमांसाठी भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे.
सावर्डे आरोग्यकेंद्राला
विद्यार्थिनींची शैक्षणिक भेट
सावर्डे ः येथील गोविंदराव निकम माध्यमिक विद्यालयात किमान कौशल्यावर आधारित वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ शाखेतील अकरावी, बारावीच्या विद्यार्थिनींनी प्राथमिक आरोग्यकेंद्राला शैक्षणिक भेट दिली. या भेटीदरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ. वैष्णवी वानखडे यांनी विद्यार्थिनींना विविध आरोग्यविषयक महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन केले. प्राथमिक आरोग्यकेंद्राचे कार्य, क्षयरोग व मलेरिया निदान-उपचारपद्धती, कुष्ठरोग निर्मूलन, किशोरवयीन मुलींच्या आरोग्याशी संबंधित समस्या, लसीकरणाचे महत्व, साथीचे आजार, वैयक्तिक स्वच्छता आदीं बाबींवर सविस्तर माहिती विद्यार्थिनींना देण्यात आली. तसेच शवविच्छेदन कक्षाची माहितीही विद्यार्थिनींना प्रत्यक्ष दाखवून समजावून सांगण्यात आली. विद्यार्थिनींबरोबर मार्गदर्शक जगन्नाथ गावडे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

