एसटीची हेल्पलाईन सेवा बनली विद्यार्थ्यांचा आधार

एसटीची हेल्पलाईन सेवा बनली विद्यार्थ्यांचा आधार
Published on

एसटीची ‘हेल्पलाईन सेवा’ बनली विद्यार्थ्यांचा आधार
जिल्ह्यातील ५५ हजार विद्यार्थ्यांना होणार मदत; पालकांकडून स्वागत
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : जिल्ह्यातील सुमारे ५५ हजार विद्यार्थी दररोज एसटी बसमधून ये-जा करतात. विद्यार्थी-विद्यार्थिनींना शाळेला जाताना किंवा शाळेतून घरी येताना एसटी प्रवासात अडचण आल्यास त्यांना थेट मदत मागता येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाने हेल्पलाईन सुरू केली आहे. एसटी वेळेवर आली नाही, रद्द झाली अशावेळी विद्यार्थ्यांना हेल्पलाईनवरून मदत मागता येणार आहे. यासाठी महामंडळाने हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध केला असून विद्यार्थ्यांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
शालेय विद्यार्थ्यासाठी मासिक पासमध्ये ६६.६६ टक्के सवलत दिली जाते. तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत बारावीपर्यंतच्या मुलींना मोफत मासिक पास दिला जातो. संध्याकाळी शाळा-महाविद्यालय सुटल्यानंतर किमान तासात मुले त्यांच्या घरी पोचावेत. बस वेळेवर न आल्याने मुलांना घरी पोहोचण्यास उशीर होतो. या पार्श्वभूमीवर हेल्पाईन उपयुक्त असून थेट विद्यार्थी-विद्यार्थ्यांचीदेखील विभाग नियंत्रकांना संपर्क करून समस्या मांडू शकतात. बस उशिरा सुटणे, अचानक रद्द झाल्यामुळे विद्यार्थी-विद्यार्थिनींचे तास चुकतात, परीक्षेला वेळेवर पोहोचू शकत नाहीत. घरी जाण्यास उशीर होणे, असे प्रकार घडतात. अशावेळी नुकसानीला संबंधित आगार व्यवस्थापक, पर्यवेक्षकांना जबाबदार धरले जाणार आहे. विद्यार्थ्यांची चढ-उतार जास्त असते, अशा थांब्यावर आगार पर्यवेक्षकांनी गणवेशात थांबून वाहतुकीचे नियोजन करावे. शाळेचा शेवटचा मुलगा बसमधून घरी जाईपर्यंत पर्यवेक्षकांनी हालू नये. विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये याची काळजी घ्यावे, असेही आदेश महामंडळाने दिले आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. या हेल्पलाईनचा जिल्ह्यातील ५५ हजार विद्यार्थ्यांना चांगला फायदा होणार आहे. यासाठी १८००२२१२५१ हा हेल्पलाईन क्रमांक दिला आहे.
---
चौकट
बसेस वेळेवर सोडण्याची मागणी
राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून त्याला शालेय विद्यार्थ्यांनी या निर्णयाचे स्वागतच केले आहे. मात्र रत्नागिरी आगारातून कित्येक बसेस वेळेवर सुटत नाहीत. अचानक रद्द होते त्यामुळे नाइलाजास्तव खासगी बसेस, वडापने प्रवास करून विद्यार्थ्यांना शाळेला जावे लागते. त्यामुळे एसटी विभागाने गाड्या वेळेवर सोडणे आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थी व प्रवाशांनी दिल्या आहेत.
---
कोट
आदेशानुसार रत्नागिरी विभागात ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची चढ-उतार जास्त असते अशा थांब्यावर आगार पर्यवेक्षक गणवेशात थांबून वाहतुकीचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरू आहे.
-प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com