राज्य नाट्य स्पर्धा
-rat५p२.jpg-
२५O०८५७३
रत्नागिरी ः राज्य नाट्यस्पर्धेत सम्राट फाउंडेशन वाटद-खंडाळा या संस्थेने केलेल्या ‘तृतीयपंथी पुरुष’ या नाटकातील एक क्षण.
(नरेश पांचाळ- सकाळ छायाचित्रसेवा)
----
(४ डिसेंबर पान नंबर ५)
स्त्रीत्वाची जपणूक करणारे
‘तृतीयपंथी पुरुष’
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ः तृतीयपंथी असणं म्हणजे नक्की काय असतं? त्यांच्या जीवनात येणाऱ्या अडचणी तसेच समाजात राहून त्यांनी समाज आणि सर्वसामान्य स्त्रीसाठी केलला त्याग याचे उत्तम उदाहरण राज्य नाट्यस्पर्धेत ‘तृतीयपंथी पुरुष’ या नाटकातून पाहायला मिळाले. सम्राट फाउंडेशन वाटद-खंडाळा या संस्थेने हा प्रयोग केला. समाजात कोठेही दिसणारे तृतीयपंथी (किन्नर) हा बऱ्याच अंशी एक कुतूहल, थट्टा, समाजापासून दूर अशा भावानांचे मिश्रण असलेला विषय लेखक ः प्रशांत नाईक यांच्या संहितेतून तयार झाला. दिग्दर्शक मुकेश जाधव यांच्या संकल्पनेतून तयार झालेले नाटक अभिनयातून रसिकांना भावले तर तृतीयपंथींच्या व्यथाचेही दर्शन झाले.
---
मुंबईत चाळीत तृतीयपंथीची खोली असते. बाजूला एक पानटपरी, रस्ता आणि याच दाटीवाटीने राहणारे सर्वसामान्य लोक. एके दिवशी लग्न झालेली गरोदर अनुसयाला नवरा मारतो, हाकलून देतो. त्यांचा आरडाओरडा पाहून तृतीयपंथी गंगा, बसंती, चंपा या तिला सोडवून आणतात. तिचे मुंबईत कुणीच नसतं. प्रेमात लग्न केलेला नवरा दुसरे लग्न करून मोकळा होतो. अनुसया तृतीयपंथीच्या खोलीत वास्तव्य करते. तिला मुलगा होतो. त्याचं बारसही तृतीयपंथी करतात. त्याचं नाव अर्जून (लाल्या) ठेवलं जातं. अर्जून शाळेत जातो; पण त्याला इतर समाजातील मुलं जवळ करत नाहीत. तृतीयपंथीच्या घरात राहात असल्याचे हिणवतात. गंगा त्याच्यासाठी सामाजिक कार्य करणारे पत्रकार दादासाहेब यांना सांगून ‘त्या’ शाळेतून काढून लाल्याला शिक्षणासाठी बाहेर पाठवतात. त्याला उच्चशिक्षण देतात. तो डॉक्टर होतो; पण हे सगळं करत असताना तृतीयपंथी गंगा, बंसती, चंपा या अनुसयाला घरातच राहण्याचा सल्ला देतात. कारण, बाहेर रस्त्यावर गेल्यावर गुंड तिच्या स्त्रीत्वाचा अपमान करतात. तृतीयपंथीच्या घरात राहणाऱ्या अनुसयाला जीव मुठीत घेऊन जगावं लागते. एकदा अनुसया कामासाठी घराबाहेर पडते. त्या वेळी गंगा तिला वाचवते. त्यालाही मारहाण, दुखापत होते. गंगा अहोरात्र कष्ट करून लाल्याच्या शिक्षणाचा खर्च करत असते. तृतीयपंथीचे कुटुंब सांभाळत असते. लाल्या डॉक्टरीची परीक्षा देऊन घरी येतो. डॉक्टर होतो. सर्व तृतीयपंथी चाळीत आनंदोत्सव साजरा करतात; पण लाल्या तृतीयपंथींच्या घरी राहाणे पसंत नसते. लाल्या आई अनुसयाकडे १०० रुपये नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी मागतो. तेही तिच्याकडे नसतात अखेर ती गंगाच्या पर्समधून शंभर रुपये काढून देते. गंगा घरात आल्यावर तृतीयपंथी बंसती, चंपावर चोरीचा आळ घेते; पण अनुसया आपण चोरी केल्याचे सांगते. या वेळीही गंगा लाल्यासाठी पैसे दिले यात धन्यता मानतो.
इकडे गंगा लाल्याला मोठ्या हॉस्पिटलला नोकरी मिळावी यासाठी काबाडकष्ट करून मिळवलेली सर्व पुंजी दादासाहेबांना देतो. लाल्याला मोठ्या हॉस्पिटलला नोकरी मिळते. लाल्या आई अनुसयाला घेऊन हॉस्पिटलच्या कॉटर्सला घेऊन जातो. इकडे गंगा आजारी पडते; पण लाल्या त्याला पाहायला यायला नकार देतो. हॉस्पिटलचे डीन त्याला जा म्हणून सांगतात. त्या वेळी आई अनुसया तृतीयपंथी गंगाची सर्व हकिगत सांगते. ज्या वेळी लाल्या गंगाला पाहायला येतो तोपर्यंत गंगाचे प्राण अनंतात विलीन झालेले असतात. अशी हृदयस्पर्शी कथा ‘तृतीयपंथी पुरुष’ या नाटकात सादर करण्यात आली.
-------
सूत्रधार आणि सहाय्य
नेपथ्य ः रामदास मोरे, रंगभूषाः श्रीकृष्ण शिर्के, प्रकाशयोजना ः प्रकाश पवार. पार्श्वसंगीत ः संदेश भेकरे आणि विजय भुजबळराव.
-----
पात्र परिचय
गंगा - मुकेश श्रीपत, बसंती- सागर कांबळे, चंपा- महेश संजय, अनुसया - लक्ष्मी गिलबिले, दादासाहेब- सुहास खानविलकर, राजू पानवाला -सोमेश कांबळे, मोठा लाल्या (अर्जून देशमुख)-मृणाल जाधव. गुंड-१ आणि पोस्टमन-विनीत जाधव. गुंड-२-स्पंदन पवार. गीता-वंश, सलमा-सिद्धांत, हेमा-अंकीत.
----------
आजचे नाटक
नाटक ः ‘तू पालनहारी,’ सादरकर्ते ः स्टार थिएटर, रत्नागिरी. स्थळ ः स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी. वेळ ः सायंकाळी ७ वा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

