‘हसत खेळत संविधान जागर’ उपक्रमास मोरगावात प्रतिसाद

‘हसत खेळत संविधान जागर’ उपक्रमास मोरगावात प्रतिसाद

Published on

08727

‘हसत-खेळत संविधान जागर’
उपक्रमास मोरगावात प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ५ ः संविधान संवाद समिती महाराष्ट्र आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मोरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हसत-खेळत संविधान जागर’ हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आला. ‘संविधान आणि आपण’ या विषयावर सत्र घेण्यात आले.
या सत्रात विद्यार्थ्यांना प्रस्ताविकेतील समता, समानता, न्याय आणि बंधुता या मूल्यांची ओळख, खेळ, गप्पा, गटचर्चा आणि संवाद यांच्या माध्यमातून करून दिली. ओळख सत्रात विद्यार्थ्यांना नाव, आईचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव अशी समानतेची नवी ओळख सांगण्याची पद्धत समजावून देण्यात आली. मुलांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
नियमांचे महत्त्व या विषयावर गटचर्चा घेण्यात आली. दुसरीतील आरोही आणि तन्मय या दोन विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण सहभाग घेतला. संविधान संवादक अमोल रोहिणी, दत्ताराम कदम यांनी सूत्रसंचालन केले. या उपक्रमासाठी सहकार्य व परवानगी दिल्याबद्दल मुख्याध्यापक भाग्यश्री कुबल तसेच शिक्षकवृंद संतोष गवस, स्वाती पाटील, ज्ञानेश्वर सावंत आणि इतर कर्मचारी यांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com