जाकादेवी-विद्यार्थ्यांवर संस्कार होणे काळाची गरज
विद्यार्थ्यांवर संस्कार होणे काळाची गरज
विलास दीडपिसे ः वाचनातून व्यक्तिमत्व विकास
सकाळ वृत्तसेवा
जाकादेवी, ता. १० ः आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आणि वाढत्या प्रसारमाध्यमांच्या काळात विद्यार्थ्यांवर संस्कार होणे काळाची गरज आहे. यासाठी त्यांना आपल्या महामानवाच्या जीवनाची, त्यांच्या कार्याची व संघर्षाची माहिती असली पाहिजे. त्यामधूनच विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होऊ शकतो. त्यासाठीच वाचन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जयगड येथील सागरी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विलास दीडपिसे यांनी व्यक्त केले.
रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले, लहान वयात विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण झाल्यास असे विद्यार्थी भविष्यात यशस्वी वाटचाल करत असतात. त्यासाठी शाळेने राबवलेला हा उपक्रम उपयुक्त ठरतो. संतोष निंबाळकर यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती सांगताना विद्यार्थी सलग १२ तास वाचनास बसले आहेत, ही बाब नक्कीच समाधानकारक असून, सातत्याने असे उपक्रम राबवण्यात यावेत तसेच अशा उपक्रमाची व्याप्ती वाढवून परिसरातील शाळांनीही या उपक्रमात सहभागी होण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
बसणी हायस्कूलचे मुख्याध्यापक पांडुरंग नाईक यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला अध्यक्ष अप्पा धनवाडे, मुख्याध्यापक सुरेश सुर्वे, अनिता नाईक, मुख्याध्यापिका महामाया सुर्वे, रंजना कदम, शिक्षक मनोहर इनामे यांनी भेट दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

