महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेत रत्नागिरीचा सन्मान

महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेत रत्नागिरीचा सन्मान

Published on

-rat१०p१८.jpg-
२५O०९७४४
रत्नागिरी : श्रीराम खरे
----
महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या
उपाध्यक्षपदी श्रीराम खरे
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेची निवडणूक प्रक्रिया जळगाव येथे झाली. यात रत्नागिरीचे ज्येष्ठ बुद्धिबळ मार्गदर्शक व रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष श्रीराम खरे यांची महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. त्यांच्या या निवडीमुळे रत्नागिरी जिल्ह्याचा गौरव वाढला असून, जिल्ह्यातील बुद्धिबळ चळवळीला नवी उभारी मिळणार आहे.
या निवडणूक सभेला संघटनेचे आधारस्तंभ अशोक जैन, निरीक्षक ए. के. रायजादा उपस्थित होते. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांचे प्रतिनिधी या सभेस उपस्थित होते. नवीन कार्यकारिणीत खरे यांच्यासह विविध विभागांतील अनुभवी व दूरदृष्टी असलेले सदस्य निवडून आले आहेत. कार्यकारिणी अशी : अध्यक्ष- डॉ. परिणय फुके (गोंदिया), कार्याध्यक्ष- सिद्धार्थ मयूर (जळगाव), मानद सरचिटणीस- निरंजन गोडबोले (पुणे), खजिनदार- भरत चौगुले (कोल्हापूर), उपाध्यक्ष- सुनील रायसोनी (नागपूर), चिदंबर कोटीभास्कर (सांगली), श्रीराम खरे (रत्नागिरी), सहसचिव- सतीश ठाकूर (जालना), डॉ. दीपक तांडेल (ठाणे), अश्विन मुसळे (चंद्रपूर), कार्यकारिणी सदस्य- जीएम अभिजित कुंटे, जीएम विदित गुजराथी, आयएम सौम्या स्वामीनाथन्, डब्ल्यूजीएम स्वाती घाटे, नियुक्त सदस्य- राजेंद्र कोंडे (उपाध्यक्ष), अंकुश रक्ताडे (सहसचिव), रवींद्र धर्माधिकारी (सहसचिव).
---
कोट
रत्नागिरी आणि कोकणात बुद्धिबळ विकासासाठी अधिकाधिक उपक्रम राबवण्याचा आमचा संकल्प आहे. राज्यभरातील खेळाडूंना समान संधी मिळाव्यात यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करू. रत्नागिरीच्या बुद्धिबळ चळवळीला नवसंजीवनी देऊ.
- श्रीराम खरे.

Marathi News Esakal
www.esakal.com