...उद्यापासून पुन्हा प्रभाग १० मध्ये प्रचाराचा धुरळा

...उद्यापासून पुन्हा प्रभाग १० मध्ये प्रचाराचा धुरळा

Published on

रत्नागिरी प्रभाग १० मध्ये प्रचाराला वेग
२० ला मतदान ; महायुती-महाआघाडीत लढत
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : निवडणूक आयोगाने स्थगिती दिलेल्या प्रभाग क्र. १० मधील सदस्यपदाच्या निवडणुकीमुळे या प्रभागात पुन्हा प्रचाराला सुरुवात होणार आहे. पहिल्या निवडणुकीवेळी या प्रभागात निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या दोन प्रचार फेऱ्या झाल्या आहेत. निवडणूक पुढे गेल्याने मतदारांना भेटण्याची अधिक संधी मिळाली.
रत्नागिरी पालिकेच्या प्रभाग क्र. १०ची आयोगाने स्थगित केलेल्या सदस्यपदासाठीच्या निवडणुकीसाठी अर्ज माघारीची अंतिम मुदत आज १० असून, मतदान २० डिसेंबरला होणार आहे तर निकाल २१ डिसेंबरला जाहीर केला जाणार आहे. रत्नागिरी प्रभाग क्र. १० मधील अपक्ष उमेदवार सचिन शिंदे आणि संपदा रसाळ-राणा या दोघांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तसेच जिल्हा न्यायालयाकडूनही अवैध ठरवण्यात आले. त्यामुळे या उमेदवारांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्याचा निर्णय अद्याप मिळालेला नसल्याने २१ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. आयोगाकडे केलेल्या मागणीनुसार, प्रभाग क्र. १० अ आणि ब साठीची मतदान प्रक्रिया स्थगित झाली. या प्रभागामध्ये महायुतीकडून भाजपचे राजू तोडणकर आणि मानसी करमरकर या तर महाविकास आघाडीकडून राजाराम रहाटे आणि कोरगावकर निवडणूक रिंगणात आहेत.

Marathi News Esakal
www.esakal.com