ओणी-अणुस्कुरा मार्गावर खड्डेच खड्डे

ओणी-अणुस्कुरा मार्गावर खड्डेच खड्डे

Published on

rat१०p१२.jpg-
२५O०९७२८
राजापूर ः पाचल मार्गावर पडलेले खड्डे.
-----
ओणी-अणुस्कुरा मार्गावर खड्डेच खड्डे
प्रवाशांचे हाल : पाचलवासीयांचा आंदोलनाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १० ः कोकणला घाटमाथ्याशी जोडणाऱ्या राजापूर-अणुस्कुरा मार्गावरील ओणी-अणुस्कुरा या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्त्यातील खड्डे चुकवताना आणि खड्डेमय रस्त्यातून वाहने चालवून आणि त्यातून प्रवास करून वाहनचालकांसह प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे पाचल परिसरातील ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आठ दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा पाचल परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे.
ओणी-अणुस्कुरा रस्त्याच्या दयनीय स्थितीबाबत पाचल येथील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता स्वप्नील बावधनकर यांना निवेदन दिले. निवेदन देताना प्रसाद पळसुलेदेसाई, प्रकाश पाताडे, अरविंद लांजेकर, संदेश आंबेकर, राजेश खानविलकर, चंद्रकांत कानेटकर आदी उपस्थित होते.
सातत्याने वाहनांची वर्दळ असलेल्या ओणी-अणुस्कुरा रस्त्याची मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे पार चाळण झाली आहे. ओणी दैतवाडी परिसर, सौंदळ पाटीलवाडी, सौंदळ बाजारपेठ, कोळवणखडी, येळवण, रायपाटण, पाचल आदी भागातील रस्ता खड्डेमय झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने यापूर्वी पाचल ते अणुस्कुरा घाटापर्यंत पडलेले खड्डे काही प्रमाणात बुजवले आहेत; मात्र, त्यानंतरही सातत्याने राहिलेल्या वाहतुकीमुळे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पूर्वपरिसरातील अत्यवस्थ रुग्णाला अधिक उपचारार्थ सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबईकडे नेताना या खड्ड्यामुळे अधिक त्रास होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com