कोकण
कुडाळ वाचनालयातर्फे रविवारी वाचक स्पर्धा
कुडाळ वाचनालयातर्फे
रविवारी वाचक स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १०ः (कै.) विजया वामन पाटणकर वाचनालय (तालुका ग्रंथालय), कुडाळच्या वतीने रविवारी (ता. १४) सकाळी १०.३० वाजता वाचक स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी गंगाराम गवाणकर यांची एक साहित्यकृती यावर दहा मिनिटे सादरीकरण करावयाचे आहे. या तालुकास्तरीय स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी होणार आहे. यासाठी प्रथम क्रमांक ५०० रुपये व प्रशस्तीपत्र, द्वितीय ३०० रुपये व प्रशस्तीपत्र, तृतीय २०० रुपये व प्रशस्तीपत्र अशी पारितोषिके आहेत. इच्छुक स्पर्धकांनी आपली नावनोंदणी शनिवारपर्यंत (ता.१३) करावी. स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन केले आहे.

