विठ्ठल लुडबे यांचे निधन
लोगो ः निधन वृत्त
--
09753
विठ्ठल लुडबे
कुडाळ, ता. १० ः बिबवणे-नाईकवाडी येथील रहिवासी व आरोग्य विभागातील निवृत सुपरवायझर विठ्ठल नारायण लुडबे (वय ८४) यांचे सोमवारी (ता. ८) रात्री राहत्या घरी निधन झाले. ते आरोग्य विभागात आरोग्य सहाय्यक म्हणून रुजू झाले. त्यानंतर त्यांनी पदोन्नतीवर सुपरवायझर म्हणून काम केले. या विभागात त्यांनी धुळे जिल्हा तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड, वेंगुर्ले, कणकवली, मालवण तालुक्यांत सेवा दिली. त्यांच्या मागे मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. साईदत्त केबलचे उमेश लुडबे यांचे ते वडील होत.
....................
09752
नारायण शिरोडकर
सावंतवाडी, ता. १० ः उभाबाजार येथील सुवर्णकार नारायण उर्फ बंड्या दत्ताराम शिरोडकर (वय ६३) यांचे आज अल्पशा आजाराने कोल्हापूर येथील रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी व तीन बहिणी असा परिवार आहे. ‘सुवर्ण ज्वेलर्स’चे संजू शिरोडकर यांचे ते भाऊ होत.

