खेड लायन्स क्लब सिटीतर्फे मदतीचा हात

खेड लायन्स क्लब सिटीतर्फे मदतीचा हात
Published on

लायन्स सिटीतर्फे
मदतीचा हात
खेड ः लायन्स क्लब ऑफ सिटीच्या वतीने भरणे येथील नवभारत वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी महिनाभर पुरेल इतके जीवनावश्यक साहित्य वितरित करत मदतीचा हात दिला. यासाठी सागर करवा यांचे सहकार्य लाभले. या वेळी लायन्स क्लब ऑफ सिटीचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, माजी अध्यक्ष रोहन विचारे, डॉ. ज्ञानेश्वर मरकड, सागर करवा, प्रतीक गिल्डा आदी उपस्थित होते.

खेडचे तिघे जिल्हा क्रिकेट संघात
खेड ः खेड क्रिकेट अॅकॅडमीच्या तीन खेळाडूंची १९ वर्षाखालील जिल्हा क्रिकेट संघात निवड झाली आहे. धनंजय झोरे, श्रवण शिर्के, ऐमन गोंधळेकर अशी खेळाडूंची नावे आहेत. हे तिघेही अष्टपैलू खेळाडू असून, विविध स्पर्धांमध्ये संघाला विजेतेपद मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या कामगिरीच्या बळावर तिघांनाही जिल्हा क्रिकेट संघात स्थान मिळाले आहे. खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक कैलास सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्हा संघात तिघांची निवड झाल्याबद्दल जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष रहिम सहिबोले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

वरवलीत लोकसहभागातून
पाच मिशन बंधारे
खेड ः तालुक्यातील वरवली येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जांभू नदीतील विहीर परिसर आणि सुतारवाडी पंधलीचा पाणी येथे लोकसहभागातून ५ मिशन बंधारे उभारण्यात आले. या कामांचे नेतृत्व सरपंच प्राजक्ता यादव यांनी केले. ग्रामपंचायत सदस्य, शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी, अंगणवाडी सेविका, तलाठी, कृषी सहाय्यक, मुख्याध्यापक, आरोग्यसेवक-सेविका, आशासेविका, ग्रामस्तरीय मंडळ, युवक-युवती, शेतकरी गट तसेच महिला ग्रामसंघ आणि महिला बचतगट यांनी सक्रिय सहभाग नोंदवत १ डिसेंबरला बंधारे पूर्ण केले. बंधार्‍याच्या कामात गावकऱ्यांचा शंभर टक्के सहभाग दिसून आला. या बंधाऱ्यांमुळे स्थानिक परिसरातील भूगर्भजल पातळी उंचावेल तसेच एप्रिल-मे महिन्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर मोठ्या प्रमाणात मात करता येणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

राजन कोरगावकर
यांच्याशी चर्चा
खेड ः महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती राज्य महासचिव राजन कोरगावकर यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या खेड शाखेला सदिच्छा भेट दिली. यामध्ये त्यांनी सभासदांच्या विविध प्रश्नांविषयी चर्चा केली. त्यांनी शिक्षक समिती शाखा खेड राबवत असलेल्या विविध उपक्रमाबद्दल कौतुक केले. या वेळी तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण, तालुका नेते शरद भोसले, जिल्हा प्रतिनिधी श्रीकृष्ण खांडेकर, कार्याध्यक्ष अनिल यादव, उपाध्यक्ष नरेश ठोंबरे, सल्लागार परशुराम पेवेकर आदी उपस्थित होते.

कळंबणीत उत्तरकार्यालाच मृत्यू दाखला
खेड ः तालुक्यातील कळंबणी बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच भगवान साळुंके यांनी सरपंचपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर गेल्या २ वर्षांपासून मृत व्यक्तीच्या उत्तरकार्यात त्यांच्या कुटुंबाला मृत्यूदाखला देण्याचे स्तुत्य काम सुरू केले आहे. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना हेलपाटे घालायला लागू नयेत, त्यांचे विम्याचे, शेतीचे, वारसकाम व इतर कामे जलदगतीने होण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. नुकतेच मृत झालेले भिकू महादेव शिगवण यांचा मृत्यूदाखला त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आला. या वेळी सरपंच भगवान साळुंके, उपसरपंच, सर्व सदस्य आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com