खारेपाटण किल्ल्यावर स्वच्छता अभियान
09843
खारेपाटण किल्ल्यावर स्वच्छता अभियान
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १० : ‘मावळे आम्ही स्वराज्याचे’ वैभववाडी विभागातर्फे खारेपाटण किल्ल्यावर दिवाळीपासून सतत स्वच्छता मोहिमा राबवत आहे. या अभियानांतर्गत किल्ल्याच्या तटबंदीसाठी नुकसानकारक ठरणारी अनावश्यक झाडी झुडपे हटविण्यात आली. या मोहिमेसाठी मावळ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
यापूर्वी दिंडी दरवाजाशिवाय किल्ला समजत नव्हता. मात्र, दुर्गसेवकांनी पूर्ण किल्ला लोकांच्या निदर्शनास येईल, अशा स्थितीत आणला. या मोहिमेत किल्ल्याच्या पूर्वेचा दिंडी दरवाजा, त्यालगतची तटबंदी, भुयारी मार्ग, दक्षिण व पश्चिम बुरुज, पश्चिम तटबंदी स्वच्छ करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत यश राऊत, साहिल गुरव, जय उन्हाळकर, कुलदीपक राऊत, सिद्धी राऊत, सुमेधा तावडे, अक्षय तेली, सूरज पाटील, विनय आडविलकर, सार्थक जाधव, श्रेयस बाविलकर, राज तेली, प्रथम चव्हाण, दिनेश माने, वैभव भिसे, युवराज खांडेकर यांनी श्रमदान केले.

