ओटवणेतील श्री देव रवळनाथ मंडळ अव्वल

ओटवणेतील श्री देव रवळनाथ मंडळ अव्वल

Published on

swt1212.jpg
10258
गावराई ः येथे आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेवेळी गावातील जेष्ठ १८ भजनी कलाकारांना सन्मान करण्यात आला.

ओटवणेतील श्री देव रवळनाथ मंडळ अव्वल
गावराईतील भजन स्पर्धा ः पोईपच्या वेताळ मुंजेश्वर, पिंगुळीतील राऊळ महाराज मंडळांचेही यश
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १२ ः गावराई येथील जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. यात श्री देव रवळनाथ प्रा. भ. मंडळ ओटवणे यांनी प्रथम, श्री वेताळ मुंजेश्वर प्रा. भजन मंडळ पोईप द्वितीय तर श्री राऊळ महाराज भजन मंडळ पिंगुळी यांनी तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेत बुवा रोहित निर्गुण - उत्कृष्ट गायक, शुभम गावडे- उत्कृष्ट परवाज वादक तर उत्कृष्ट कोरस हा सन्मान गुरुकुल संगीत भजन मंडळ कुडाळ यांना मिळाला.
कुडाळ तालुक्यातील गावराई गिरोबा मंदीर येथे हरिनाम सप्ताह निमित्त जिल्हास्तरीय भजन स्पर्धा आयोजीत केली होती. यात अनेक भजन स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यावेळी गावातील जेष्ठ १८ भजनी कलाकारांना सन्मानित करण्यात आले. यावेळी जेष्ठ मानकरी दाजी गावडे, गणेश मेस्त्री, सरपंच सोनल शिरोडकर, ग्रामपंचायत सदस्य प्रणीता मेस्त्री, परिक्षक राजू सावंत, योगेश पांचाळ, संजय गावडे, प्रकाश परब, अमित राणे, श्रीकृष्ण परब, काका मेस्त्री, अनंत गावडे, वायरमन संतोष गावडे आदींसह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते. सुत्रसंचलन स्वप्नील वेंगुर्लेकर यांनी केले. गावराई गिरोबा मंदीर येथे सालाबाद प्रमाणे हरिनाम सप्ताह आयोजीत केला होता. या निमित्त बुवा अमित राणे यांच्या संकल्पनेतून व ग्रामस्थांच्या सहकार्यातून पार पडलेल्या या भजन स्पर्धेमध्ये ब्राह्मण देव प्रासादिक भजन मंडळ पडवे, गुरुकुल संगीत भजन मंडळ कुडाळ, राऊळ महाराज प्रासादिक भजन मंडळ पिंगळी, रवळनाथ नवतरुण भजन मंडळ ओटवणे, देव वेताळ मुंजेश्वर प्रासादिक भजन मंडळ पोईप, गुरुकुल भजन मंडळ न्हावेली घोडेमुख आदी भजन मंडळानी सहभाग घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com