

rat12p23.jpg
10220
साक्षी जड्याळ
----------
आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत साक्षी जड्याळ झळकली
कुडप येथील कन्या; इथिओपियन धावपटूंवर केली मात
चिपळूण, ता. १३ : पुणे येथे आयोजित आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत चिपळूण तालुक्यातील कुडप येथील साक्षी जड्याळ या धावपटूने इथिओपियन धावपटूंना मागे टाकून संस्मरणीय यश मिळविले. साक्षी प्रथमच फुल्ल मॅरेथॉनमध्ये (४२.१९५ कि. मी.) सहभागी झाली होती. तिच्या या यशामुळे चिपळूण तालुक्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्पर्धेत झळकले आहे.
पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन म्हटले की, आफ्रिकन धावपटूंचे वर्चस्व पाहायला मिळते. मात्र, महिलांच्या मॅरेथॉनमध्ये या वर्चस्वाला धक्का बसला आहे. महाराष्ट्राच्याच चिपळूण तालुक्यातील कुडप येथील साक्षी जड्याळने इथिओपियन धावपटूंना मागे टाकून संस्मरणीय यश मिळविले. सणस क्रीडांगणापासून रविवारी ७ डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजता मॅरेथॉनला प्रारंभ झाला. गेल्या वर्षी साक्षीने पुणे मॅरेथॉनमधील अर्धमॅरेथॉन जिंकली होती. यावेळी ती जिद्दीने ४२.१९५ किमी अंतराच्या शर्यतीत सहभागी झाली होती. यासाठी तिने गेल्या दोन-तीन महिन्यांपासून साताऱ्यात कसून सराव केला होता. या मेहनतीचे रविवारी (७ डिसेंबर) चीज झाले. जिंकण्याच्या जिद्दीनेच साक्षी मॅरेथॉनसाठी आली होती; मात्र, आफ्रिकन धावपटूंचा सराव पाहून तिच्या मनात भीतीही होती.
चौकट
सर्वोत्तम वेळेची नोंद
पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये गेल्या काही वर्षांत महिलांच्या पूर्ण मॅरेथॉनमधील हिंदुस्थानी धावपटूने नोंदवलेली ही सर्वोत्तम वेळ ठरली. इथिओपियाची एडाओ मेसेरे तुलू २ तास ४० मि. व ५६ सेकंद वेळ नोंदवून दुसऱ्या तर बोंटू डेमिसे २ तास ५० मि. ४६ सेकंद वेळेसह तिसऱ्या स्थानी राहिली. विशेष म्हणजे साक्षी प्रथमच फुल्ल मॅरेथॉनमध्ये सहभागी झाली आणि तिने देदीप्यमान यश मिळविले.