वेंगुर्लेत रविवारी
चित्रकला स्पर्धा

वेंगुर्लेत रविवारी चित्रकला स्पर्धा

Published on

वेंगुर्लेत रविवारी
चित्रकला स्पर्धा
वेंगुर्ले ः नगर वाचनालयातर्फे अनिल श्रीकृष्ण सौदागर पुरस्कृत पद्माकर सखाराम सौदागर स्मृती वेंगुर्ले तालुका मर्यादित चित्रकला स्पर्धा २८ डिसेंबरला सकाळी ९ ते ११ या वेळेत वाचनालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा आठवी ते दहावी गटात घेण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी आठवी ते दहावी गटासाठी नदीत पोहणारी मुले, ध्वजारोहण समारंभ, मतदान केंद्राचे (केंद्रावरील) दृश्य, पुस्तक प्रदर्शन (प्रदर्शनास) भेट असे चार विषय असून एका विषयावर चित्र काढायचे आहे. चित्रात किमान चार व्यक्तिरेखा असणे आवश्यक आहे. स्पर्धेसाठी एका शाळेतून जास्तीत जास्त दहा स्पर्धक सहभागी होऊ शकतात. प्रथम तीन स्पर्धकांना अनुक्रमे १,५००, १,१००, ९०० रुपये, उत्तजनार्थ दोन क्रमांकांना प्रत्येकी ७५० रुपये अशी पारितोषिके आहेत. प्रत्येक स्पर्धकाने ओळखपत्र (शाळेचे ओळखपत्र, आधारकार्ड) आणावे. संस्थेकडे २३ डिसेंबरपर्यंत नावनोंदणी करावी. अधिक माहितीसाठी संपर्क साधा, असे आवाहन कार्याध्यक्ष अनिल सौदागर, कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले आहे.
---
दाभोली ख्रिश्चनवाडीत
अवैध दारूसाठा जप्त
वेंगुर्ले ः वेंगुर्ले पोलिस पथकाने गुरुवारी (ता. ११) रात्री १०.३० च्या सुमारास दाभोली ख्रिश्चनवाडी येथे छापा टाकून सुमारे २१ हजार रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू पकडली. याबाबत बेकायदेशीर दारू बाळगल्याप्रकरणी बितोज बस्त्याव फर्नांडिस (वय ६३) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दाभोली ख्रिश्चनवाडी येथील बितोज फर्नांडिस यांनी गोवा बनावटीच्या दारूचा साठा केला असल्याची गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाल्यांनर वेंगुर्ले पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. हेडकॉन्स्टेबल जयेश सरमळकर, योगेश राऊळ, श्री. पाटील, महिला पोलिस आल्मेडा, महिला चालक पोलिस श्रीमती रणखंबे या पथकाने फर्नांडिस यांच्या घरावर अचानक छापा टाकला. यात एकूण २१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
---
कुडाळात आज
क्रिकेट स्पर्धा
कुडाळ ः कुडाळ तालुका एम. आर. फ्रेंडस् ग्रुपतर्फे उद्या (ता. १४) येथील कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व एम. आर. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील एम. आर. असोसिएशनचा संघ सहभागी होणार आहे. स्पर्धा लीग स्वरुपाची खेळविण्यात येणार आहे. सहा संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. विजेत्या-उपविजेत्या संघाला तसेच वैयक्तिक बक्षिसे, कायमस्वरुपी चषक देण्यात येणार आहे.
..............
पिकुळे येथे आज
‘नागभस्म तिलक’
दोडामार्ग ः पिकुळे लाडाचे टेंब येथील धालोत्सव रंगमंच येथे उद्या (ता. १४) सिद्धिविनायक दशावतार नाट्यमंडळ, पिकुळे यांचे ‘नागभस्म तिलक’ नाटकाचा शुभारंभी प्रयोग रात्री ९ वाजता होणार आहे. नाट्यरसिकांनी या नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com