१९७० च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

१९७० च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

Published on

rat१३p१०.jpg-
P२५O१०४३५
लोणावळा : दापोलीच्या कृषी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी लोणावळा येथे स्नेहसंमेलनाला एकत्र आले.

‘कृषी’च्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ : दापोली येथील कृषी महाविद्यालयातील १९७०ते १९७४ या कालावधीत शिकणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन लोणावळा येथे उत्साहात झाले. हे सर्व विद्यार्थी १९७४ मध्ये कृषी पदवीधर झाले. गेली काही वर्षे हे विद्यार्थी एकत्र येत आहेत. हा त्यांचा पाचवा स्नेहमेळावा आहे.
या वेळी १९ विद्यार्थी उपस्थित होते. काही विद्यार्थी प्रकृतीस्वास्थ आणि घरगुती अडचणीमुळे उपस्थित राहू शकले नाहीत; परंतु भ्रमणध्वनीद्वारे ते संपर्क साधून होते. कोकणाबरोबरच सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर, लातूर येथील विद्यार्थी उपस्थित होते.
महाविद्यालयातील त्या काळी शिकवणाऱ्या प्राध्यापकांचे स्मरण करून आठवणी कथन केल्या. या स्नेहमेळाव्यात डॉ. मोहन झगडे, डॉ. लक्ष्मण पवार, डॉ. दिलीप नागवेकर, विजय चव्हाण, भालचंद्र जोशी आणि अशोक कदम, शिरीष पवार, विठ्ठल फडतरे, राजाराम करांडे, उद्धवराव वाघ, प्रदीप पाटील, बाहुबली मेहता, हंसराज गाडेकर, सुरगोंडा पाटील, दिलीप पाटील, विजय जोशी, उत्तम घोलप, ज्ञानदेव रोंगे आणि सुधीर राजे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com