झाराप कुंभारवाडी शाळेचे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत यश

झाराप कुंभारवाडी शाळेचे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत यश

Published on

10582

झाराप कुंभारवाडी शाळेचे
केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत यश
कुडाळ ः झाराप केंद्रस्तरीय बाल, कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार क्रीडा स्पर्धेत झाराप कुंभारवाडी शाळेने उल्लेखनीय यश प्राप्त केले. यात लांब उडीमध्ये रिया हरमलकर हिने प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक व प्रशस्तीपत्रक, १०० मीटर धावणे स्पर्धेत रिया हरमलकर तृतीय, ‘ज्ञानी मी होणार’मध्ये रिया हरमलकर व गुंजन धुरी यांनी तृतीय क्रमांक पटकावला. खो-खो लहान गटात शाळेने उपविजेतेपद पटकावले. यशस्वी स्पर्धक रिया हरमलकर, गुंजन धुरी, सावी आवळेगावकर, भूमी हरमलकर, दिक्षा पावसकर, रिया पावसकर, हर्षदा हळदणकर, अनुश्री जांवडेकर, काजल कक्केरकर, अन्विका हरमलकर, नविन्या हरमलकर, गणेश हरमलकर व साईश हरमलकर यांचे शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने अध्यक्ष अन्वी हरमलकर, उपाध्यक्षा चित्रा कुडाळकर यांनी अभिनंदन केले. सर्व मुलांना क्रीडा शिक्षक गणेश धुरी, अश्विनी तेली व मुख्याध्यापक शैलेंद्र न्हावेलकर यांचे मार्गदर्शन लाभले.
...................
10589

बुद्धिबळपटू पूर्वांक कोचरेकरचे कौतुक
सावंतवाडी ः राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत आठ वर्षीय पूर्वांक कोचरेकर याने उल्लेखनीय यश प्राप्त करत महाराष्ट्रासह कोकणाचे लक्ष वेधून घेतले आहे. आपल्या दुसऱ्याच राष्ट्रीय स्पर्धेत त्याने तब्बल पाच आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडूंवर विजय मिळवत एकूण पाच गुणांची कमाई केली. लहान वयात दाखवलेल्या उत्तुंग कामगिरीबद्दल भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी त्याचे अभिनंदन केले. यावेळी परब यांनी, इतक्या कमी वयात राष्ट्रीय पातळीवर यश मिळवणे ही गौरवाची बाब असून, पूर्वांकचा प्रवास अनेक नवोदित खेळाडूंना प्रेरणा देणारा आहे. भविष्यात तो देशाचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त केला. या यशाबद्दल पूर्वांकचे सिंधुदुर्ग-रत्नागिरीसह सर्वस्तरांतून कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com