सावंतवाडीतील कॅरमपटूंचे निर्विवाद वर्चस्व
swt1419.jpg
10713
कुडाळ ः येथे आयोजित जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेतील क्षण.
सावंतवाडीतील कॅरमपटूंचे निर्विवाद वर्चस्व
कुडाळातील जिल्हास्तर स्पर्धाः विजेत्या खेळाडूंची विभागस्तरासाठी निवड
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १४ः सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शालेय १४, १७ आणि १९ वयोगटातील मुला-मुलींच्या कॅरम स्पर्धेमध्ये यंदाही सावंतवाडी तालुक्यातील खेळाडूंनी आपले वर्चस्व सिद्ध केले. कुडाळ हायस्कूल येथे १२ व १३ डिसेंबरला झालेल्या या स्पर्धेत सावंतवाडीच्या खेळाडूंनी सर्वाधिक विजेतेपद पटकावली.
प्रमुख विजेते (पहिले ते सहावे क्रमांक) : १९ वर्षांखालील गट मुले-स्वप्नील लाखे (सावंतवाडी), अथर्व तेंडुलकर (वेंगुर्ले), सुयश रणशिंगे (कणकवली), आर्यन गवंडळकर (मालवण), भूषण मडगावकर (सावंतवाडी), साईराज राऊळ (कुडाळ). मुली-प्रणिता आयरे (सावंतवाडी), दीक्षा देवगडकर (कुडाळ), दुर्वा राणे (मालवण), गंगुताई पाटील (मालवण), मानसी करंगुटकर (वेंगुर्ले), रिया गावडे (दोडामार्ग). १७ वर्षांखालील गट मुले-अमूल्य घाडी (सावंतवाडी), शार्दुल भोगटे (कुडाळ), सुधांशू धुरी (कुडाळ), विराज पेडणेकर (कुडाळ), आदित्य धर्णे (दोडामार्ग), यश म्हापसेकर (दोडामार्ग). मुली-पूर्वा केतकर (देवगड), साक्षी रामदुरकर (सावंतवाडी), निदा होलसेकर (देवगड), श्रेया महाडिक (कणकवली), आस्था लोंढे (सावंतवाडी), आर्या सावंत (कणकवली).
१४ वर्षांखालील गट मुले-भरत सावंत (सावंतवाडी), तर पीयूष परब (सावंतवाडी), विराज चौगुले (देवगड), सार्थक वायंगणकर (कणकवली), मंथन पास्ते (सावंतवाडी), गणेश परब (सावंतवाडी). मुली-दिव्या राणे (कुडाळ), आरजू शेख (सावंतवाडी), ईश्वरी आदम (देवगड), दिया साटम (देवगड), जान्हवी सोनार (कणकवली), रेवा पाटील (मालवण) यांनी यश मिळविले.
जिल्हास्तरीय स्पर्धेत विजयी ठरलेले हे सर्व खेळाडू आता विभागीय स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. येत्या १६ व १७ डिसेंबरला कुडाळ मराठा समाज हॉल येथे क्रीडा विभागाच्या वतीने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्ह्यांतील १४, १७ व १९ वयोगटातील मुले आणि मुलींच्या विभागीय स्तरावरील स्पर्धांचे आयोजन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

