परिचारिकांचे सेवाव्रत मानवसेवेचे प्रतीक

परिचारिकांचे सेवाव्रत मानवसेवेचे प्रतीक

Published on

swt151.jpg
10775
कुडाळ ः बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन करताना डॉ. गिरीश ओक. सोबत डॉ. गुरुराज कुलकर्णी, सुंदर गाळवणकर, उमेश गाळवणकर, अमृता गाळवणकर व मान्यवर. (छायाचित्र ः अजय सावंत)

परिचारिकांचे सेवाव्रत मानवसेवेचे प्रतीक
डॉ. गिरीश ओकः कुडाळ नर्सिंग महाविद्यालयात सांस्कृतिक महोत्सव
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १५ः ‘नर्सेसचे काम हे जीवन-मरणाचे काम आहे. ते त्यांच्याशिवाय शक्य नसते. शस्त्रक्रियेच्या प्रधानकर्माबरोबर पूर्व कर्म आणि पश्चात कर्म या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. ते कार्य नर्सेस पार पाडत असतात. त्यातून माणसांची सेवा घडत असते. माणसांच्या जीवनात नर्सेस-ब्रदर्स हे डॉक्टरांएवढीच महत्त्वाची भूमिका निभावत असतात’, असे प्रतिपादन ज्येष्ठ मराठी सिने नाट्य अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनी केले.
बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या सांस्कृतिक महोत्सवामध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. ओक म्हणाले, "बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयामध्ये नर्सिंगचे शिक्षणतज्ज्ञ, डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली दिले जाते. हे सर्व करत असताना व्यक्तिमत्त्वाच्या परिपूर्णतेसाठी सांस्कृतिक कलाकारांसारखी स्वानंदाची भूमिकाही त्या उत्तम पद्धतीने निभावत असतात. आपल्यामध्ये असलेले सुप्त कलाकार त्या जपतात, हे फार महत्त्वाचे आहे. आपले अष्टपैलूत्व जपता आले पाहिजे. त्यातील कलाकाराला जपा. तोच तुम्हाला नीरस साचेबंद जीवनातून बाहेर काढून जगण्यात रस निर्माण करून नवी उमेद देऊन जाईल."
ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. गुरुराज कुलकर्णी म्हणाले, ‘‘बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेजमधील नर्सेस-बॉईज हे अॅकॅडेमिकमध्येही सक्षम असतात. त्याचबरोबर सांस्कृतिक, स्पोर्ट्समध्येही ते अव्वल आहेत. आपल्यातील हा आनंद देणारा कलावंत ताजा व जिवंत ठेवावा. तोच आपणास नवसंजीवनी देईल.’’ संस्था चेअरमन उमेश गाळवणकर यांनी, माया, प्रेम आणि त्यातून निर्माण झालेले ऋणानुबंध महत्त्वाचे आहेत. टीव्हीवर दिसणारी कलावंत माणसांना प्रत्यक्ष पाहण्याचा त्यांना भेटण्याचा योग यानिमित्ताने जुळवून आला. सेवाव्रत स्वीकारल्यामुळेच तुमच्यासारखी माणसे आमची संपत्ती बनली आहेत, असे सांगत सर्वांचे स्वागत केले.
व्यासपीठावर सुंदर गाळवणकर, अमृता गाळवणकर, प्राचार्य कल्पना भंडारी, प्रा. वैशाली ओटवणेकर, प्रा. डॉ. प्रत्युष रंजन बिस्वाल, प्रा. अरुण मर्गज, पल्लवी कामत, प्रा. चैताली बांदेकर आदी उपस्थित होते. या सांस्कृतिक सोहळ्यात दर्जेदार व कलात्मक अदाकारीने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. मंदार जोशी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सुमन करंगळे-सावंत यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com