शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध
swt153.jpg
10777
पांग्रडः शाळेला प्रदान करण्यात आलेल्या संगणकाचे उद्घाटन करताना ज्ञानदेव सावंत, कावेरी चव्हाण, औदुंबर मर्गज, महेश कुंभार व इतर मान्यवर. (छायाचित्र ः अजय सावंत)
शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध
माजी विद्यार्थ्यांची ग्वाहीः पांग्रड-कुंभ्याचीवाडी शाळेत स्नेहमेळावा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १५ः शाळेला सर्वतोपरी मदत करून सर्वांगीण विकासासाठी अखंड कार्यरत राहू, अशी ग्वाही देत माजी विद्यार्थ्यांनी स्नेहमेळाव्याचा आनंद लुटला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांग्रड कुंभ्याचीवाडी क्र. १ चा पहिला माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात पार पडला.
गावच्या प्रथम नागरिक सरपंच कावेरी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. या मेळाव्याला ज्येष्ठ मार्गदर्शक औदुंबर मर्गज, ज्ञानदेव सावंत, विठ्ठल उर्फ संजय सावंत, रवींद्र तावडे, रेश्मा मर्गज, माजी सरपंच सुनील मर्गज, अमोल मर्गज, माजी सरपंच रघुनाथ घाडी, अमोल पांग्रडकर, शिक्षक महेश कुंभार, सचिन ठाकूर, अजय फुंदे, श्रीमती माथनकर आदी उपस्थित होते.
शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर करून मान्यवरांचे स्वागत केले. श्री. मर्गज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शाळेचे समाजातील महत्त्व विशद केले. शाळा, पालक व समाज यांनी शाळेच्या विकासात हातभार लावला पाहिजे, याबाबत मार्गदर्शन केले. पांग्रड ग्रामस्थांच्या वतीने शाळेला अद्ययावत संगणक प्रदान करण्यात आला. शाळेला आणखी एक संगणक लवकरच देऊ, असे आश्वासनही ग्रामस्थांनी दिले. संगणकाचे उद्घाटन ज्ञानदेव सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
श्री. कुंभार यांनी शाळेच्या प्रगतीबाबत माहिती दिली. विविध स्पर्धा परीक्षेत मुलांनी मिळविलेले यश, केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेतील दर्जेदार कामगिरी, शाळेच्या भविष्यातील उपक्रमांची तसेच आवश्यक भौतिक गरजांची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी बिटस्तरासाठी शाळेच्या समूहगीत, कबड्डी, रिले संघाची निवड झाल्याबद्दल विशेष अभिनंदन करण्यात आले. त्यानंतर शासन आदेशानुसार माजी विद्यार्थी संघाची स्थापना करून अध्यक्षपदी ज्ञानदेव सावंत, उपाध्यक्ष प्रवीण मर्गज, कोषाध्यक्ष प्रकाश मर्गज, सल्लागार औदुंबर मर्गज, विठ्ठल उर्फ संजय सावंत यांची निवड करण्यात आली. नूतन अध्यक्ष सावंत यांनी शाळेला ५० प्लास्टिक खुर्च्या देण्याचे आश्वासन दिले. संघात प्रत्येक वाडीतून सदस्य घेण्यात आले. मान्यवरांना अल्पोपहार देण्यात आला. अशाप्रकारे आनंदी उत्साही वातावरणात स्नेहमेळावा झाला. सूत्रसंचालन महेश कुंभार यांनी, अहवाल वाचन पदवीधर शिक्षक अजय फुंदे यांनी केले. आभार मुख्याध्यापक सचिन ठाकूर यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

