रत्नागिरी- २०४७ मध्ये विकसित, स्वास्थ्यवर्धक भारत व्हावा
rat15p1.jpg-
10756
रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मणसंघातर्फे विविध पुरस्कारांचे वितरण डॉ. उपेंद्र किंजवडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. पुढे बसलेल्या पुरस्कारप्राप्त व्यक्ती आणि मागे उभे मान्यवर, कार्यकारिणी सदस्य. (मकरंद पटवर्धन : सकाळ छायाचित्रसेवा)
---------
२०४७ मध्ये विकसित, स्वास्थ्यवर्धक भारत व्हावा
डॉ. उपेंद्र किंजवडेकरः कऱ्हाडे ब्राह्मणसंघाचे वार्षिक पुरस्कार वितरण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ : भारताच्या स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवात म्हणजे २०४७ मध्ये भारत विकसित होण्याकरिता व स्वास्थ्यवर्धक पिढी होण्याकरिता आतापासूनच प्रयत्न आवश्यक आहेत. भाज्या, फळांचा आहारात भरपूर वापर, व्यायाम व नातेसंबंध जपण्याची गरज असून ही सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. उपेंद्र किंजवडेकर यांनी केले.
रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मणसंघाच्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात रविवारी दुपारी हा कार्यक्रम झाला. स्वास्थ्य : नवी पिढी-नवी आव्हाने या विषयावर डॉ. किंजवडेकर यांनी उद्बोधक व्याख्यान दिले. भारतात सध्या मधुमेह, ताणतणाव, आत्महत्या, मोबाईल अॅडिक्शन, स्थूलपणा, कर्करोग असे आजार वाढत असल्याचे सांगून ते म्हणाले की, फास्टफूड, अतिरासायनिक प्रक्रिया केलेले पॅकबंद खाद्यपदार्थांचे खाण्याचे वाढते प्रमाण यामुळे आजारपण वाढू लागले आहे. ते वेळीच रोखण्याची जबाबदारी सर्वांची आहे.
या वेळी अध्यक्ष माधव हिर्लेकर व उपाध्यक्ष मानस देसाई, कार्यकारिणी सदस्य अॅड. प्रिया लोवलेकर, प्रतिभा प्रभुदेसाई, सुयोगा जठार, मिलिंद आठल्ये, दिलीप ढवळे, उमेश आंबर्डेकर, विवेक पुरोहित उपस्थित होते. अध्यक्ष हिर्लेकर यांनी डॉ. किंजवडेकर यांचा सन्मान केला. प्रास्ताविकामध्ये हिर्लेकर म्हणाले, समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांची माहिती घेऊन त्यांना संघातर्फे पुरस्कार देतो. महिला, तरुण मंडळींना प्रोत्साहन, कौतुक करणे व त्यांचे काम समाजासमोर यावे, असे याचे उद्देश आहेत. ओघवते सूत्रसंचालन प्रतिभा प्रभुदेसाई यांनी केले. उपाध्यक्ष देसाई यांनी आभार मानले. स्वरदा लोवलेकर हिने सुरेल आवाजात संपूर्ण वंदे मातरम् सादर केले.
चौकट १
यांना मिळाला पुरस्कार
राणी लक्ष्मीबाई पुरस्कार- वैष्णवी फुटक, धन्वंतरी पुरस्कार- डॉ. गजानन केतकर, आदर्श पौरोहित्य पुरस्कार- वेदमूर्ती अनिरूद्ध ठाकूर, आचार्य नारळकर पुरस्कार- प्रज्ञेश देवस्थळी, आदर्श कीर्तनकार पुरस्कार- हभप पुरूषोत्तम काजरेकर, उद्योजक पुरस्कार- प्रशांत आचार्य व हृषिकेश सरपोतदार आणि उद्योगिनी पुरस्कार- कांचन चांदोरकर व कृषीसंजीवन पुरस्कार- अतुल पळसुलेदेसाई.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

