काजूला भाव नाही; सरकार जागं कधी होणार?
10846
काजूला भाव नाही; सरकार जागं कधी होणार?
उत्पादकांचा प्रश्न; दोनशे रुपये प्रमाणे हमीभाव द्या
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १५ ः चालू वर्षीच्या हंगामापूर्वी काजू बी करिता हमीभाव निश्चित करून काजू उत्पादक शेतकऱ्यांना प्रति किलो २०० रुपये प्रमाणे हमीभाव मिळावा, अथवा बोनस अनुदान द्यावे, अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा शेतकरी संघटना व काजू उत्पादक शेतकरी यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकरी यांच्यावतीने आज जिल्हाधिकारी धोडमिसे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वेंगुर्ले तालुक्यातील फळ संशोधन केंद्रामध्ये विकसित केलेल्या प्रगत जातीची कलमे लावून शेतकऱ्यांनी आपल्या बागा तयार केल्या आहेत. या काजू बागांचे जतन करण्यासाठी व देखभालीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येतो. मात्र, उत्पादित होणाऱ्या काजू बी ला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. तसेच बदलत्या हवामानामुळे नुकसान होते. मात्र, त्या प्रमाणात भरपाई शासनाकडून मिळत नाही. तरी शासनाने काजू बी साठीचा जोखीम कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढवून द्यावा, वन्य प्राण्यापासून होणाऱ्या नुकसानीची भरपाई द्यावी तसेच फळ पिकावरील उद्भवणाऱ्या कीड रोगाच्या प्रतिबंधासाठी फळ संशोधन केंद्राकडून प्रभावी कीटकनाशकाचे संशोधन व्हावे, आदी मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहेत. याबाबतचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. यावेळी जिल्हा शेतकरी संघटनेचे श्यामसुंदर राय, देवेंद्र सावंत, समीर गावकर, सोमनाथ परब, संतोष तांबे आदी उपस्थित होते.
--------------------
हवामान बदलामुळे नुकसानीची झळ
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे बदलत्या हवामानामुळे गेली चार-पाच वर्षे नुकसान होत आहे. शासनाच्या योजनेअंतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काजू लागवड झालेली आहे. मात्र, काजू बी ला योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

