रोटरीकडून विज्ञानरथ फिरती प्रयोगशाळा
-rat१५p८.jpg-
२५O१०७८९
चिपळूण - मिरजोळी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना विज्ञान प्रयोगाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले
-----
‘रोटरी’कडून विज्ञानरथ फिरती प्रयोगशाळा
चिपळूण ः रोटरी क्लब व इनर्व्हिल क्लब लोटे यांच्या माध्यमातून पद्माकर सुतार यांच्या विशेष प्रयत्नाने विज्ञानरथ फिरती प्रयोगशाळा हा उपक्रम खेड, लोटे, दापोली, चिपळूण परिसरातील शाळांमध्ये राबवण्यात आला. यामध्ये ९ शाळेतील साडेतीन हजार विध्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला. भौतिक, रसायनिक शास्त्र या विषयावर विविध प्रयोगाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. प्रयोग प्रत्यक्ष मुलांकडून करून घेतल्याने त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. हा विज्ञानरथ तामिळनाडू येथील परीक्षण चॅरिटेबल ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ वीरूधूनगर यांच्या संकल्पनेने गावातील मुलासाठी सायन्स ऑन व्हील ही थीम घेऊन साकारला आहे. सायन्समधील तज्ज्ञ व शिकवण्याचे कौशल्य असलेले शिक्षकांसह इनर्व्हील क्लबच्या प्रमुख उत्कर्षा पाटील यांच्यामुळे या परिसरात तामिळनाडूतून आला होता.
पैसाफंड स्कूलमध्ये क्रीडा महोत्सव
संगमेश्वर ः पैसाफंड इंग्लिश स्कूल येथे तीन दिवसांचा क्रीडा महोत्सव उत्साहात झाला. क्रीडाध्वज फडकवल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक सचिनदेव खामकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी संस्थेचे सचिव धनंजय शेट्ये, पर्यवेक्षक प्रकाश दळवी, क्रीडाशिक्षक नवनाथ खोचरे आदी उपस्थित होते. तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात कबड्डी, रस्सीखेच, लंगडी, गोळाफेक, बुद्धिबळ, लांब उडी, उंच उडी, खोखो, थाळीफेक असे विविध सामने खेळवले गेले.
कुंभाळजाईची २६ पासून गिर्यारोहण मोहीम
खेड ः आठगाव मोरे (राव) परिवार संचलित श्री कुंभाळजाई सामाजिक विकास संस्थेतर्फे २६ आणि २७ डिसेंबरला सुभा प्रांत जावळी खोऱ्यात ‘सहवास सह्याद्रीचा’ गिर्यारोहण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात सुभा प्रांत जावळीच्या दुर्गम भागाचा परिचय करून घेतला जाणार आहे. ऐतिहासिक खुणा, पायवाटा, घनदाट अरण्यातील निसर्गाचा अनुभव व अभ्यास करणे, वन्यप्राणी व पक्षी यांची माहिती करून घेणे, औषधी वनस्पतींची ओळख करून घेतली जाणार आहे. मानवनिर्मित वणवे, बेसुमार जंगलतोड रोखण्यासाठी विशेष जनजागृती या उपक्रमाद्वारे केली जाणार आहे. घोणसपूर सप्त शिवालय जोम मल्लिकाअर्जुन ते कोकणकडा ते रामेरान परिसर ते श्री निरीपजी देवी देवालय, कांदाट-जावळी ते पर्वत सप्त शिवालय अशा परिक्रमेत पायवाट, डोंगरदरी, खिंड, सुळका यांचा समावेश आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी विकास मोरे यांच्याशी संपर्क साधावा, असे संस्थेचे अध्यक्ष विनोद मोरे, सचिव प्रशांत मोरे यांनी कळवले आहे.
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

