समस्यांवर कौशल्याने मात करा

समस्यांवर कौशल्याने मात करा

Published on

10861

समस्यांवर कौशल्याने मात करा

कविता शिंपी ः कुणकवळेत स्काऊट-गाईडचे शिबिर

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १५ : ‘जीवनात येणाऱ्या समस्यांवर मात कशी करावी, याचे आपल्याला शिक्षण निसर्ग निवास शिबिरातून मिळते. शिबिरात मिळणाऱ्या कौशल्याचा वापर विद्यार्थ्यांनी आपल्या पुढील आयुष्यात करावा,’ असे प्रतिपादन माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांनी कुणकवळे येथे केले.
वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टाच्या आठवी ते दहावीच्या स्काऊट-गाईड विद्यार्थ्यांचे निसर्ग निवास शिबिर कुणकवळे (ता. मालवण) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे झाले. या शिबिरास भेट दिल्यानंतर शिक्षणाधिकारी शिंपी यांनी मार्गदर्शन केले. दोन दिवसीय निसर्ग निवास शिबिरात स्काऊट-गाईडच्या विद्यार्थ्यांनी स्वतः जेवण बनवण्याचा आनंद घेतला. तसेच स्काऊट गाईडच्या अभ्यासक्रमातील प्रात्यक्षिकेही केली. या शिबिरात विद्यार्थ्यांनी संघभावना, नेतृत्वगुण, मेहनत करण्याची तयारी, जीवनकौशल्य, सहकार्य भावना असे विविध गुण प्रत्यक्ष कृतीतून अनुभवले. शेकोटी कार्यक्रमातून आपल्या विविध कलागुणांना वाव दिला. सामाजिक बांधिलकी जपताना कुणकवळे गावातील ओहोळावर वनराई बंधारा घालत ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ हा संदेश दिला.
या शिबिरासाठी वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मुख्याध्यापिका व गाईड कॅप्टन देवयानी गावडे, स्काऊट गाईड विभागप्रमुख समीर चांदरकर, स्काऊट मास्टर एकनाथ राऊळ, किसन हडलगेकर, भूषण गावडे, गाईड कॅप्टन सिमरन चांदरकर, अमिषा परब, माजी शिक्षिका संध्या तांबे, ज्योती मालवदे, प्रकाश कदम यांनी मार्गदर्शन केले. शिबिरास कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष आनंद वराडकर, कुणकवळे सरपंच मंदार वराडकर, कुणकवळे केंद्रशाळेचे मुख्याध्यापक श्री. सरनाईक व ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त कर्नल शिवानंद वराडकर, ॲड. एस. एस. पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष शेखर पेणकर, सचिव सुनील नाईक, विजयश्री देसाई, साबाजी गावडे, रवींद्रनाथ पावसकर, शालेय समितीचे अध्यक्ष सुधीर वराडकर, संचालिका स्वाती वराडकर, श्रद्धा नाईक यांनी उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com