सिंधुदुर्गनगरीत रविवारी ‘क्रॉसकंट्री निवड’
सिंधुदुर्गनगरीत रविवारी ‘क्रॉसकंट्री निवड’
रविवारी चाचणी स्पर्धा; हौशी अॅथलेटिक असोसिएशनचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १६ ः सिंधुदुर्ग जिल्हा हौशी अॅथलेटिक असोसिएशनतर्फे रविवारी (ता.२१) सकाळी ९ वाजता जिल्हास्तरीय क्रॉसकंट्री निवड चाचणी स्पर्धा आयोजित केली आहे. त्यामधून राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा संघ निवडला जाईल. छत्रपती शिवाजी महाराज कृषी महाविद्यालय ओरोस (गरुड सर्कल) येथून ही स्पर्धा विविध गटांमध्ये सुरू होईल.
राज्य स्पर्धा १० जानेवारीला संभाजीनगर येथे होणार असून यासाठी होत असलेल्या निवड चाचणी स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा हौशी अॅथलेटिक असोसिएशनने केले आहे.
सहभागी होण्यासाठी वयोगट असे ः खुला गट पुरुष आणि महिला-२० वर्षे पूर्ण असलेले, २० वर्षांखालील गट-मुलगे वा मुली २५ -१-२००६ ते २४-१-२००८ दरम्यान जन्मलेले. १८ वर्षांखालील गट मुलगे आणि मुली २५-१-२००८ ते २४-१ -२०१० दरम्यान जन्मलेले. १६ वर्षांखालील गट मुलगे आणि मुली २५-१-२०१० ते २४-१-२०२२ दरम्यान जन्मलेले असावे.
स्पर्धा अशा ः खुलागट पुरुष व महिला-१० किलोमीटर धावणे, २० वर्षांखालील मुलगे-८ किलोमीटर धावणे, मुली-६ किलोमीटर धावणे, १८ वर्षांखालील मुलगे-६ किलोमीटर धावणे, मुली-४ किलोमीटर धावणे. १६ वर्षांखालील मुलगे आणि मुली- प्रत्येकी २ किलोमीटर धावणे. या सर्वं वयोगटांना राज्य स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार आहे. खुला गट आणि २० वर्षे वयोगटातून राज्य स्पर्धेसाठी प्रथम चार खेळाडूंची निवड करण्यात येईल, तर १८ व १६ या दोन्ही वयोगटांतून प्रत्येकी प्रथम दोन खेळाडूंना राज्य स्पर्धेसाठी पाठविले जाईल. संबंधित खेळाडू अनुपस्थित राहिल्यास पुढील क्रमाने येणाऱ्या खेळाडूला अग्रक्रम देण्यात येईल. खेळाडूला ‘यूआयडी’ नंबर काढणे अनिवार्य आहे. ओरिजिनल जन्म प्रमाणपत्र आवश्यक असून राज्य स्पर्धेसाठी प्रवास, निवास, जेवण आदी सर्व खर्च खेळाडूंना करावा लागेल. जिल्ह्याचा प्रवेश फॉर्म ऑनलाइन भरावा.
जिल्हास्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धांसाठी १४ वर्षांखालील गट मुलगे व मुली २५-१-२०१२ ते २४-१२०१४-२ किलोमीटर धावणे. १२ वर्षांखालील गट मुलगे आणि मुली २५-१-२०१४ ते २४- १-२०१६. स्पर्धा अंतर प्रत्येकी १ किलोमीटर धावणे, १० वर्षांखालील गट मुलगे आणि मुली २५-१-२०१६ ते २४-१-२०१८ स्पर्धा अंतर प्रत्येकी १ किलोमीटर, ८ वर्षांखालील गट मुलगे आणि मुली २५-१-२०१८ ते २४- १-२०२० या कालावधीत जन्मलेले. स्पर्धा अंतर १ किलोमीटर धावणे, १४, १२, १०, ८ या वयोगटांना राज्य स्पर्धा नाही. सहभाग प्रशस्तिपत्रके देण्यात येतील. विजेत्यांना मेडल व मेरिट सर्टिफिकेट देण्यात येईल. या स्पर्धांमध्ये अधिकाधिक खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन कल्पना तेंडुलकर, रणजितसिंग राणे, बाळकृष्ण कदम, रामदास देशमुख यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

