वंजारे कॉलेज, राणी पार्वतीदेवी कॉलेजला चषक

वंजारे कॉलेज, राणी पार्वतीदेवी कॉलेजला चषक

Published on

-rat१६p४.jpg-
२५O११००२
रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सवानिमित्त आंतरराज्य वक्तृत्व स्पर्धेचे वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय गटातील विजेते. मध्ये बसलेले डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, डॉ. मकरंद साखळकर, हृषिकेश पटवर्धन, प्रा. सुनील गोसावी व परीक्षक मंडळी.
---
कुसुमताई वंजारे, राणी पार्वतीदेवी महाविद्यालयाला चषक
स्वामी स्वरूपानंद वक्तृत्व स्पर्धा ; अपूर्व सामंत, आदिती राजाध्यक्ष गटामध्ये प्रथम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : स्वामी स्वरूपानंद राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत वरिष्ठ महाविद्यालयीन गटात अपूर्व सामंत आणि कनिष्ठ गटात आदिती राजाध्यक्ष यांनी प्रथम क्रमांक पटकावला. सांघिक चषक वरिष्ठ गटात श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे कॉलेज (लांजा) आणि कनिष्ठ गटासाठी राणी पार्वतीबाई हायस्कूल व ज्यु. कॉलेज (सावंतवाडी) यांनी प्राप्त केला. स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ (पावस) आणि अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) आयोजित आंतरराज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा गोगटे महाविद्यालयाच्या डॉ. केळकर सेमिनार हॉलमध्ये झाली.
बक्षीस वितरणावेळी प्रमुख वक्ते आणि आध्यात्मिक मार्गदर्शक डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी स्वामींचे तत्वज्ञान यावर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले, संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी आणि पावसच्या स्वामी स्वरूपानंदांनी अभंग ज्ञानेश्वरी सांगून अनेकांना मार्ग दाखवला. अनेकदा या दोघांचेही एकत्रित संदर्भ दिले जातात. स्वामींना प्रतिज्ञानेश्वर म्हणूनही ओळखले जाते.
या प्रसंगी स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे कार्यवाह हृषिकेश पटवर्धन, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य सुनील गोसावी मंचावर उपस्थित होते. कार्यवाह हृषिकेश पटवर्धन यांनी ही स्पर्धा दरवर्षी यशस्वीपणे आयोजित केली जात असल्याचे सांगून स्वामींच्या चरित्रावर चिंतन व्हावे, हा स्पर्धेचा हेतू आहे, असे सांगितले.
वरिष्ठ गटासाठी परीक्षक म्हणून जयंत फडके व शंकर गावडे यांनी तर कनिष्ठ गटासाठी अमृता नरसाळे व अॅड. सोनाली खेडेकर यांनी काम पाहिले. प्रा. अन्वी कोळंबेकर यांनी सूत्रसंचालन केले. स्पर्धाप्रमुख प्रा. मानसी गानू यांनी निकाल जाहीर केला. प्रा. कृष्णात खांडेकर यांनी परीक्षकांचा परिचय करून दिला. प्रा. अभिजित भिडे यांनी आभार मानले.
-----
चौकट १
स्पर्धेचा निकाल असा
वरिष्ठ महाविद्यालयीन गट- प्रथम- अपूर्व सामंत (पंडित द्वारकाप्रसाद मिश्रा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आयटी, जबलपूर मध्यप्रदेश), द्वितीय- प्रथमेश चव्हाण (बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय, पुणे), तृतीय- मनस्वी नाटेकर (गोगटे- जोगळेकर महाविद्यालय), उत्तेजनार्थ- निधी बडे (फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे), रोजीना साबळे (कला व विज्ञान महाविद्यालय, सावर्डे). कनिष्ठ महाविद्यालयीन गट- प्रथम- आदिती राजाध्यक्ष (राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्यु. कॉलेज, सावंतवाडी), द्वितीय- शुभम नाटेकर (बी. के. बिर्ला कॉलेज, मुंबई), तृतीय- सृष्टी कुंभार (डॉ. बी. आर. सामंत ज्यु. कॉलेज, पावस), उत्तेजनार्थ- मैत्रेयी आपटे (सर परशुराम कॉलेज, पुणे), स्वानंदी शेंबवणेकर (अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय). सांघिक फिरता चषक- वरिष्ठ गट- श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे कॉलेज, लांजा, उत्कृष्ट मार्गदर्शक- डॉ. महेश बावधनकर. कनिष्ठ गट- राणी पार्वतीबाई हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी, उत्कृष्ट मार्गदर्शक- महाश्वेता कुबल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com